मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'माझा चित्रपट पाहा' म्हणत आमिरनं रिक्षावर पोस्टर चिकटवून केलं होतं प्रमोशन

'माझा चित्रपट पाहा' म्हणत आमिरनं रिक्षावर पोस्टर चिकटवून केलं होतं प्रमोशन

Aamir Khan Quayamat se Quayamat tak promotion video: बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या (Aamir khan) वाढदिवसी त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो रिक्षावर पोस्टर चिटकवून 'कयामत से कयामत तक' या त्याच्या पहिल्या चित्रपटाचं प्रोमोशन करताना दिसत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 14 मार्च: बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Aamir khan) आज आपला 56 वा वाढदिवस (56th Birthday) साजरा करीत आहे. गेल्या तीन दशकांपासून आमिरनं करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्याचे अनेक चित्रपट जागतिक स्तरावर नावाजले गेले आहेत. अशा या गुणवान अभिनेत्याचे वाढदिवसी त्याचा एक जुना व्हिडिओ (Old Video Viral) सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये त्याने चित्रपट विश्वात पाऊल ठेवल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्ये त्याने आपल्या सुरुवातीच्या दिवसांचा संघर्ष सांगितला आहे. आमिर खानचा पहिला चित्रपट 'कयामत से कयामत तक' (Quayamat se quayamat tak) प्रदर्शित झाल्यनंतर आणि 1989 सालचा 'राख' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या मधल्या काळातला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तो चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी आणि पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात जो संघर्ष करावा लागला याबाबत बोलला आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे. खरंतर चित्रपटात येण्यापूर्वी आमिर खानने एनएम महाविद्यालयात 11 वी आणि 12 वी साठी कॉमर्समधून अॅडमिशन घेतलं होतं. पण त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं. चित्रपट सृष्टी त्याला खुणावत होती. पण आमिर खानचे वडिल त्याच्या निर्णयाच्या विरोधात होते. पहिल्यांदा शिक्षणावर लक्ष दे, असं आमिरच्या वडिलांनी आमिरला बजावलं होतं. हे ही वाचा-आमिर खान दररोज खातो पत्नीचा ओरडा; या वाईट सवयीमुळं कुटुंब आहे त्रस्त सुरुवातीला आमिरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपट विश्वात पाऊल ठेवलं होतं. त्याने सुरुवातीची तीन वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. दरम्यानच्या काळात त्याने आपले काका नासीर हुसेन यांच्यासोबत तीन वर्षात दोन चित्रपटांवर काम केलं आहे. 'मंजिल मंजिल' आणि 'जबरदस्त' या दोन चित्रपटात त्याने सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं आहे. यानंतर त्याने 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आणि त्याच्या आयुष्याला कलाटणीचं मिळाली. हे ही वाचा-आमिर खान आठ दिवस करायचा नाही आंघोळ; या आहेत अभिनेत्याला वाईट सवयी या चित्रपटाबद्दल सांगताना आमिरने अनेक आठवणी सांगितल्या आहेत. खरंतर चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालेल की नाही, याबाबतची चिंता त्याला सतावत होती. त्यामुळे आमिर आपल्या काही मित्रांना घेवून प्रत्येक रिक्षावर पोस्टर चिटकावून चित्रपटाचं प्रोमोशन करत होता. तो अनेक रिक्षावाल्यांना थांबवून विनंती करून हे पोस्टर चिटकवत होता. तसेच आपण या चित्रपटात 'हिरो' आहे, असंही तो रिक्षावाल्यांना सांगत आहे.
First published:

Tags: Aamir khan, Bollywood News

पुढील बातम्या