मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आमिर खानची ऑनस्क्रिन आई 60व्या वर्षी पडली प्रेमात, केल लग्न; नवरा नवरीला पाहून भटजीही झाले हैराण

आमिर खानची ऑनस्क्रिन आई 60व्या वर्षी पडली प्रेमात, केल लग्न; नवरा नवरीला पाहून भटजीही झाले हैराण

suhasini muley

suhasini muley

वयाच्या 60व्या वर्षी आयुष्याचा पार्टनर शोधला या गोष्टीवरून त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नाविषयी सुहासिनी मुळ्ये काय म्हणाल्या पाहा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  22 मार्च : प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. हेच वाक्य एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं खरं करून दाखवलं आहे. मालिका, सिनेमा गाजवलेली मराठमोळी अभिनेत्री सुहसिनी मुळ्ये यांच्या आयुष्यातही असंच काहीस घडलं आहे. सुहासिनी मुळ्ये या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील महत्त्वाचं नाव आहे. 72 वर्षांच्या सुहासिनी मुळ्ये यांनी अनेक सिनेमा आणि टेलिव्हिजन मालिकेत काम करत आपली एक नवी ओळख निर्माण केली. 'दिला चाहता है', 'जोधा अकबर' आणि 'हू तू तू' या सिनेमांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे आशुतोष गोवारिकरच्या 'लगान' सिनेमात त्यांनी आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती. सुहासिनी मुळ्ये त्यांच्या सिनेमा व्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिल्या.

अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये वयाच्या 60व्या वर्षी प्रेमात पडल्या. त्यांनी त्यांचं लग्न तब्बल 4 वर्ष लपवून ठेवलं होतं. पण जेव्हा सगळ्यांना त्यांच्या लग्नाची गोष्ट समजली तेव्हा त्यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला होता.  त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी आयुष्याचा पार्टनर शोधला या गोष्टीवरून त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी आणि ट्रोलिंगविषयी स्पष्ट मत मांडलं होतं.

हेही वाचा - पहिल्या प्रियकराच्या आठवणीत ढसाढसा रडते शिल्पाची लाडकी बहिण; 18व्या वर्षीच अपघातात गमावलं प्रेम

डीएनएच्या एका मुलाखत सुहासिनी मुळ्ये म्हणाल्या होत्या की,  "4 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. मी फिजिक्सचे प्रोफेसर अतुल गुर्गु बरोबर लग्न केलं. मी अचानक लग्न केल्यानं इतक्या चर्चा का होत आहेत हे मला कळत नाही?  माझं लग्न इतका मोठा विषय नाहीये की लोकांनी त्यावर इतकी चर्चा करावी. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कधीच म्हातारे होत नाही तसंच लग्न करण्यासाठीही म्हातारे नसता.  आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी वयाची गरज नसते".

अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये आणि त्यांचा नवरा अतुल फेसबुकवर भेटले. त्यांनी फेसबुकवर बोलणं सुरू केलं. आधी एकमेकांना समजून घेतलं आणि जेव्हा आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत असं लक्षात आलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर आर्य समाजाच्या पद्धतीनं रितसर लग्न केलं. त्यांच्या लग्नावेळीचा एक मजेशीर किस्सा देखील त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. त्या म्हणाल्या होत्या, "आम्ही दुसऱ्यांदा लग्न करायला गेलो तेव्हा भटजींना सांगितलं की आम्ही लग्न झालेलो दाम्पंत्य आहोत. हे ऐकून भटजी हैराण झाले होते. त्यांनी आम्हाला हकलून लावलं होतं".

मीडिया रिपोर्टनुसार, अतुल हे सुहासिनी मुळ्ये यांचं पहिलं प्रेम नाही. 90च्या दशकात त्या एका व्यक्तीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये  होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. प्रेम न टिकल्यानं त्या अनेक वर्ष सिंगल राहिल्या. तर अतुलचं हे सुहासिनी यांच्याबरोबर दुसरं लग्न आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं कॅन्सरनं निधन झालं.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Marathi actress