मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘किरण आणि मी एकत्र शॉवर घ्यायचो’; आमिर खानचा थ्रोबॅक किस्सा पुन्हा चर्चेत

‘किरण आणि मी एकत्र शॉवर घ्यायचो’; आमिर खानचा थ्रोबॅक किस्सा पुन्हा चर्चेत

आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Aamir Khan and Kiran Rao announce divorce) त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु त्यांच्या घटस्फोटाच्या निमित्तानं त्यांच्या प्रेमाचा दाखला देणारा हा किस्सा आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 3 जुलै: आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला. त्यांच्यात इतकं प्रेम होतं की दोघं अनेकदा अंघोळसुद्धा एकत्रच करायचे. ही चकित करणारी खासगी माहिती स्वत: आमिर खाननं करण जोहरला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. (Koffee with Karan) यामुळं त्यावेळी आमिरला काही नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केलं होतं. आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Aamir Khan and Kiran Rao announce divorce) त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु त्यांच्या घटस्फोटाच्या निमित्तानं त्यांच्या प्रेमाचा दाखला देणारा हा किस्सा आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

2013 साली करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी हजेरी लावली होती. यावेळी करणनं रॅपिड फायर राऊंडमध्ये आमिरला अंघोळीबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याने, “मी अनेकदा अंघोळी करण्याचा कंटाळा करतो. कारण वाघ कधी अंघोळ करत नाही. पण अनेकदा मी आणि माझी पत्नी आम्ही एकत्र अंघोळ केली आहे. यावरून तुझ्या लक्षात येईल आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे.” असं गंमतीशीर उत्तर आमिरनं दिलं. या उत्तरामुळं त्यावेळी आमिरची खिल्ली देखील उडवण्यात आली होती.

VIDEO: माध्यमांसमोर KISS करत सर्वांनाचं केलं होतं अवाक्; वाचा आमिर-किरणचा तो किस्सा

" isDesktop="true" id="574123" >

आमिर-किरणच्या Love Story मध्ये तो फोन कॉल ठरला 'टर्निंग पॉइंट', असे पडले होते प्रेमात

किरणच्या आधी आमिर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण राव आणि आमिर खान यांचं लग्न झालं. केवळ एका फोनच्या संभाषणानंतर आमिर खान आणि किरण राव मनाने एकमेकांच्या जवळ आले होते. एका मुलाखतीमध्ये आमिरने सांगितलं होतं की, “2001 साली तो 'लगान' फिल्मचं काम करत होता. त्यावेळी किरण राव या फिल्मची असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. त्यावेळी आमची एकमेकांशी फक्त ओळख झाली होती. माझ्या घटस्फोटानंतर एकदा मी आणि किरण अर्धा तास फोनवर बोलत होतो. फोन ठेवल्यानंतर मला तिच्याशी आणखी बोलावसं वाटत होतं. या फोन कॉलनंतर आम्ही एकमेंकांना भेटायला लागलो. आणि त्यानंतर दीड वर्षांनी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.

First published:

Tags: Aamir khan, Love story, Shocking news