चित्रपट नफा कमवेपर्यंत मी एकही रुपया घेत नाही- आमिर खान

चित्रपट नफा कमवेपर्यंत मी एकही रुपया घेत नाही- आमिर खान

बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट. प्रत्येक काम जीव तोडून करणार. त्याचा कुठलाही सिनेमा असू दे, त्यात तो अनेकदा 'लुडबूड' करणार. आणि ही त्याची लुडबूड प्रत्येकाला हवीशी वाटते.

  • Share this:

मुंबई, 02 आॅगस्ट : बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट. प्रत्येक काम जीव तोडून करणार. त्याचा कुठलाही सिनेमा असू दे, त्यात तो अनेकदा 'लुडबूड' करणार. आणि ही त्याची लुडबूड प्रत्येकाला हवीशी वाटते. कारण आमिरचा सिनेमा हा बाॅक्स आॅफिसवरही हिट आणि समीक्षकांच्याही पसंतीला उतरतो. आताही आमिर खान ठग्ज आॅफ हिंदुस्थानी सिनेमात बिझी आहे. शूटिंगबरोबर पोस्ट प्राॅडक्शनमध्येही तो लक्ष घालतो. त्याचे त्याचे असे काही वसुल आहेत. नियम आहेत. आणि ते तो काटेकोरपणे पाळतो.

माझ्या चित्रपटाचे निर्माते जोपर्यंत नफा कमवत नाहीत, तोपर्यंत मी एक रुपयाही घेत नाही, असा गौप्यस्फोट केला आहे आमिर खाननं. मी नफ्यामध्ये वाटा घेतो, पण चित्रपट रिलीज होईपर्यंत आणि तो नफा कमवेपर्यंत मी काहीच पैसे घेत नाही. पण हो, मी इतरांपेक्षा नफ्यात अधिक वाटा मागतो कारण माझा वेळ मी पणाला लावतो, असं आमिरनं सांगितलं. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात लेखक अंजुम राजाबाली यांनी आमिरशी संवाद साधला.

आमिर खान म्हणाला, पटकथा हाच सिनेमाचा आत्मा असतो. मला एकदा का सिनेमाची कथा आवडली की त्यासाठी मी माझ्याकडचं बेस्ट देतो. निर्मात्याला काहीही तोटा होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. मुलाखती दरम्यान आमिर खान म्हणाला, निर्मात्याचा तोटा झाला, तर पुढच्या सिनेमासाठी तो मला घेणार नाही. त्यामुळे मला प्रत्येक सिनेमा चांगलाच चालावा, असं वाटतं.

आमिर सांगतो, मी जेव्हा सिनेमा सुरू करतो तेव्हा निर्माता, डिस्ट्रिब्युटर्स मला सिनेमाचा विषय काय, हे एका शब्दानं विचारत नाही. कारण त्यांना सिनेमातून नफा मिळेल ही खात्री असते.

First published: August 2, 2018, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading