मुंबई, 4 जुलै: घटस्फोटाच्या 24 तासांच्या आत आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. दोघांनी एकत्र मिळून फेसबुक लाइव्ह केलं आहे. 3 जुलै रोजी आमिर खानने आणि किरण रावने घटस्फोटाचं वृत्त चाहत्यांना दिलं होतं. त्यानंतर अनेकांना धक्काच बसला होता. त्यानंतर आमिर खान आणि अभिनेत्री फातिमा सना शेख यांच्या लिंकअपच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटामागे फातिमा असल्याचंही सांगितलं जात आहे. (Aamir Khan and Kiran Rao Divorced)
दरम्यान 24 तासांनी ते एकत्र दिसले. त्यांनी एकत्रितपणे फेसबुक लाइव्ह केलं आहे. पानी फाउंडेशनकडून (Paani Foundation) आयोजित एका कार्यक्रमात दोघे सामील झाले होते. दोघांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीनची शेती करण्याचे पर्याय सुचवले. 24 तासांपूर्वी दोघांनी आपल्या एकत्रित स्टेटमेंटमध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. यात ते घटस्फोटानंतरही पानी फाऊंडेशन आणि अन्य प्रोजेक्ट्ससाठी एकत्रितपणे काम करणार असल्याचं सांगितलं होतं. पानी फाउंडेशनकडून आयोजित ‘सोयाबीनची डिजिटल शेती शाळा’ नावाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिर खान आणि किरण राव आले एकत्र
आमिर खान आणि किरण रावने फेसबुक लाइवची सुरुवात केली. यानंतर सत्यमेव जयते शोमधून प्रसिद्धीस आलेले दिग्दर्शक सत्यजीत भटकळ हेदेखील कार्यक्रमात सामील झाले. याशिवाय अनेकजणं या कार्यक्रमात सामील झाले होते.
आमिर आणि किरण रावने लग्नाच्या 15 वर्षांनंतर घेतला घटस्फोट
अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी (Aamir Khan and Kiran Rao Divorced) एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी घटस्फोटाविषयी अधिकृत स्टेटमेंटही जारी केलं आहे.
आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट (Joint Statement issued by Aamir Khan and Kiran Rao) जारी करत त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे. आमिर-किरणचा 15 वर्षांचा संसार मोडल्याने चाहत्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, ' या 15 वर्षा सुंदर वर्षात आम्ही एकत्र जीवनभरातील अनुभव, आनंद आणि हास्य शेअर केलं आहे आणि आमचं नातं केवळ विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळं वृद्धिंगत झालं आहे. आम्हाला आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात करायची आहे- आता नवरा बायको म्हणून नाही तर सह-पालक आणि एकमेकांचं कुटुंब म्हणून'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.