Home /News /entertainment /

Laal Singh Chaddha Trailer: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'ही PK सारखा, ट्रेलर पाहून नेटकरी संतापले

Laal Singh Chaddha Trailer: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'ही PK सारखा, ट्रेलर पाहून नेटकरी संतापले

आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'ही PK सारखा, ट्रेलर पाहून नेटकरी संतापले

आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'ही PK सारखा, ट्रेलर पाहून नेटकरी संतापले

अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लाल सिंह चड्ढा या सर्वसामान्य मुलाच्या आयुष्याची असामान्य गोष्ट दाखवण्यात आली आहे. तसेच भारतीय इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडी सिनेमात दाखवण्यात येणार आहेत. ( Laal Singh Chaddha Trailer Release)

पुढे वाचा ...
  मुंबई, 30 मे: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) बहुप्रतीक्षित 'लाल सिंह चड्ढा' ( Laal Singh Chaddha Trailer Release)  या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  तब्बल 100 दिवस 100लोकेशन्सवर शुट करण्यात आलेला लाल सिंह चड्ढा या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तर दुसरीकडे आमिर खानला ट्रोल देखील करण्यात आलं आहे. लाल सिंह सिनेमाचा ट्रेलर नेटकरी चांगलेच संतापल्याचं दिसून आलं.  आमिर खानचा लाल सिंह चड्ढाही PK सारखाचं असल्याचं म्हणत आमिरला ट्रोल करण्यात आलं आहे.  ट्रेलरमधून आमिरचा धमाकेदार लुक समोर आला आहे. सिनेमात आमिर एका पंजाबी सरदाराची भूमिका साकारत आहे. अनेकांनी आमिरच्या पंजाबी लुकवर देखील टीका केली आहे. आमिरचा पंबाजी लुक फेक वाटत असल्याचं म्हटलं जात आहे. तर आमिरसह सिनेमात अभिनेत्री करिना कपूर खान देखील समोर आली आहे. सिनेमात साऊथ अभिनेता नागा चैतन्य देखील दिसणार आहे. करिना सिनेमात विम्मीची भूमिका साकारत आहे. विम्मी जिचं लाल सिंगवर प्रचंड प्रेम असते. लाल सिंह चड्ढा या सर्वसामान्य मुलाच्या आयुष्याची असामान्य गोष्ट दाखवण्यात आली आहे. तसेच भारतीय इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडी सिनेमात दाखवण्यात येणार आहेत. लाल सिंह चड्ढा हा सिनेमा ऑस्कर पुरस्कार विजेता अद्वैत चंदन दिग्दर्शित 'फॉरेस्ट गम्प' या हॉलिवूड सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. 2018 साली आमिर खानला या सिनेमाचे राइट्स मिळाले होते. त्यानंतर 2019मध्ये आमिरने या सिनेमाची घोषणा केली. हेही वाचा - कल्पनेपलीकडील वास्तवाची गोष्ट; 'वाय'चा थरारक टीझर प्रदर्शित सिनेमात पंजाबी अभिनेता 'गिप्पी ग्रेवाल' दिसणार असल्याच्या अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. परंतु सिनेमाच्या ट्रेलरमध्ये त्यांची कोणतीही झलक पाहायला मिळालेली नाही.
  अभिनेता आमिर खानच्या आतापर्यंतच्या सिनेमामधील त्याचा हा सिनेमात सर्वात महत्त्वाचा आणि वेगळा असल्याचं त्याने मुलाखतीत म्हटलं होतं. 11 ऑगस्टला हा सिनेमा  प्रदर्शित होणार आहे.  एका सर्वसामान्य मुलाची असामान्य कथा सिनेमात मांडण्यात आली आहे. 2 मिनिटे 45 सेकंदाच्या ट्रेलरची सुरुवात ही आमिर खानच्या ट्रेनमधील प्रवासाने होते. लाल सिंह यांच्या लहानपणापासूनचा संपूर्ण प्रवास सिनेमातून दाखवण्यात येणार आहे.  'माँ कहती हैं जिंदगी गोल गप्पे जैसी होती हैं',  या आमिर खानच्या डायलॉगने सर्वांची मनं जिंकली आहेत. लहानपणी दिव्यांग असलेला लाल सिंह चड्ढा त्याच्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने स्वत:च्या पायावर उभा राहतो. धावण्याच्या शर्यतीत भाग घेऊन शर्यतही जिंकतो. त्यानंतर तो सैन्यात भर्ती होण्याचा निर्णय घेतो, हे ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.  सिनेमात दमदार डायलॉग असणार आहेत हे ट्रेलरवरुन लक्षात येत आहे. अभिनेत्री करिना कपूर देखील बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर धमाकेदार एंट्री करताना दिसत आहे.  लाल सिंह चड्ढा सिनेमाचा ट्रेलर शेअर करत करिनाने छान पोस्ट लिहित तिचा मुलगा जेह सुद्धा सिनेमाचा भाग असल्याचा खुलासा तिने केला. तिने म्हटलंय, 'कोरोना महामारी, त्यानंतर आलेले दोन लॉकडाऊन आणि त्यानंतर मला झालेलं बाळ. या सर्वांमुळे हा प्रवास माझ्यासाठी फार खास आहे. सिनेमाच्या शुटींगवेळी मी प्रेग्नंट होते. त्यामुळे जेह देखील नकळत या सिनेमाचा एक भाग' असल्याचं करिनाने म्हटलं.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या