VIDEO : कृष्णा कपूरच्या अंत्ययात्रेत आमिर,राणी,करण होते हसत, ट्विटरवर झाले ट्रोल

एरवी सिनेमात एखाद्याच्या मृत्यूच्या सीनवेळी कलाकार अगदी खराखुरा अभिनय करतात. पण वास्तवात वेगळं चित्र दिसतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2018 10:20 AM IST

VIDEO : कृष्णा कपूरच्या अंत्ययात्रेत आमिर,राणी,करण होते हसत, ट्विटरवर झाले ट्रोल

मुंबई, 04 आॅक्टोबर : कृष्णा राज कपूर यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. बाॅलिवूडच्या अनेक घटनांच्या त्या साक्षीदार. त्यांना अंतिम निरोप द्यायला आणि कपूर कुटुंबाचं सांत्वन करायला बाॅलिवूड लोटलं होतं. अंत्यविधीला येणारी माणसं गंभीरपणे वावरत असतात. कारण मृत्यू ही दु:खद घटना. एरवी सिनेमात एखाद्याच्या मृत्यूच्या सीनवेळी कलाकार अगदी खराखुरा अभिनय करतात. पण वास्तवात वेगळं चित्र दिसतं.

राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनावेळचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच फिरतोय.या व्हिडिओमध्ये कपूर घराण्याच्या चेंबूरच्या घराबाहेर आमिर खान, राणी मुखर्जी, अयान मुखर्जी आणि करण जोहर गप्पागोष्टी करत हसत आहेत.यावरून त्यांच्यावर ट्विटरवरून चांगलीच टीका होतेय. कुणाच्या दारावर गेल्यावर असं वागणं शोभतं का, हे फिल्म इंडस्ट्रीचे लोक असेच भंपक असतात.. अशे शेरे ट्विटरवर पहायला मिळतायेत. यावर कोणत्याही सेलिब्रिटीनं अजून तरी स्पष्टीकरण दिलेलं नाही.

Loading...

कृष्णा यांच्या पश्चात रणधीर, ऋषी, राजीव, रीमा आणि रितू ही पाच मुलं आहेत. १९४६ मध्ये राज कपूर यांच्याशी त्यांचे लग्न झाले. करिष्कमा, करिना, रणबीर आणि रिद्धिमा कपूरच्या त्या आजी आहेत. वयाच्या ८७ वर्षीही त्या फार सक्रीय होत्या. त्या कौटुंबिक पार्टी, सिनेमांच्या प्रिमिअरला अनेकदा आवर्जुन उपस्थित राहायच्या. काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर यांनी त्यांचा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला. तेव्हा संपूर्ण कपूर कुटुंबिय पॅरिसमध्ये उपस्थित होते.

१९८८ मध्ये राज कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र जोडून ठेवलं होतं. आपल्या पाचही मुलांची जबाबदारी स्वीकारली. कृष्णा यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोकाकूळ वातावरण असून. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णा राज कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

PHOTOS ‘काँट्रोव्हर्सी क्वीन’ तनुश्री दत्ता गेली ८ वर्षं कुठे होती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 10:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...