Home /News /entertainment /

Aamir Khan घटस्फोटानंतरही Kiran Raoला नाही विसरू शकला; तिच्यासाठी करणार हे काम

Aamir Khan घटस्फोटानंतरही Kiran Raoला नाही विसरू शकला; तिच्यासाठी करणार हे काम

आमिर खानने किरण रावसोबत 15 वर्षाता संसार मोडत वेगळ होण्याचा निर्णय घेतला. मात्र वेगळं झाल्यानंतर देखील तो किरणला विसरू शकलेला नाही. आता आमिर किरणसाठी एक काम करताना दिसणार आहे.

    मुंबई, 16 जानेवारी- आमिर खान(Aamir Khan) त्याच्या सिनेमाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आय़ुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. दोन लग्न करणाऱ्या आमिरने त्याच्या दोन्हीं पत्नींना घटस्फोट दिला आहे. त्याची दुसरी पत्नी किरण रावला  (Kiran Rao) घटस्फोट दिल्यानंतर देखील तो विसरलेला नाही. वेगळं झाल्यानंतर अनेकदा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. आता तो त्या एक्स वाईफ किरण रावसोबत एक सिनेमा करणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. रिपोर्टसनुसार, किरण एक कॉमे़डी ड्रामा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. विशेष म्हणजे आमिर खानची कंपनी या सिनेमाची निर्मिती करणार आहे. आमिरला सिनेमाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे. किरणने आमिरला स्क्रिप्टविषयी सांगितल्यानंतर त्यानं लगेच होकार कळवला आहे. 9 जानेवारीला चित्रीकरणाला झालेय सुरूवात किरण रावच्या या सिनेमाची कथा बिप्लब गोस्वामीने लिहिली आहे. या सिनेमात स्पर्श श्रीवास्तव आणि प्रतिभा रांटा दिसणार आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाला 9 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. या सिनेमाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील विविध भागात केले जाणार आहे. वाचा-'सगळे बदलले फक्त..', सिद्धार्थ चांदेकरच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट तब्बल 11 वर्षानंतर किरण दिग्दर्शकची खूर्ची सांभाळताना दिसणार खूप कमी लोकांना माहिती असेल की, तब्बल 11 वर्षानंतर किरण दिग्दर्शकची खूर्ची सांभाळताना दिसणार आहे. 2010 मध्ये धोबी घाट सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमात आमिरने काम केले होते. आता या नव्या सिनेमामुळे पुन्हा दोघांना एकत्र पाहता तर येणार आहे. शिवाय किरण रावलाही दिग्दर्शकाच्या खुर्चीत पुन्हा पाहता येणार आहे. वाचा-अभिनेत्री मुंबईसोडून महाराष्ट्रातील या ठिकाणी पतीसोबत करतेय शेती 2021 मध्ये मोडला 15 वर्षाचा संसार किरण आणि आमिरने 2021 मध्ये 15 वर्षातं लग्न मोडत एकमेंकापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी वेगळं झाल्याचा निर्णय घेतल्यानंतर एक स्टेटमेंट देखील जाहीर केले होते. या दोघांचा मुलगा आई किरण रावसोबत राहत आहे.मुलासाठी पालक म्हणून नेहमी दोघं एकत्र दिसतात. पालक म्हणून सर्व जबाबदारी पार पाडताना दिसतात. वेगळं झाल्यानंतरही आमच्यात मैत्रिचं नात कायम असल्याचे देखील त्यांनी सांगितलं होता.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या