आमिर खान ओशोंच्या भूमिकेत?

आमिर खान ओशोंच्या भूमिकेत?

आमिर खान लवकरच ओशो रजनीश यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ओशोंच्या आयुष्यावर बनणाऱ्या एका सीरिजमध्ये आमिरने ओशोंची भूमिका साकारावी अशी ऑफर नेटफ्लिक्सने आमिरला दिलीय.

  • Share this:

मुंबई, 27 जून : आमिर खान लवकरच ओशो रजनीश यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ओशोंच्या आयुष्यावर बनणाऱ्या एका सीरिजमध्ये आमिरने ओशोंची भूमिका साकारावी अशी ऑफर नेटफ्लिक्सने आमिरला दिलीय. तर ओशोंची सेक्रेटरी आनंद शिलाची भूमिका आलिया भट्टने करावी अशी त्यांची इच्छा आहे.

आमिर सध्या ठग्ज आॅफ हिंदोस्थानी सिनेमामध्ये बिझी अाहे. पण  त्याने अजून तरी ही ऑफर नाकारलेली नाही. त्यामुळे याबाबत तो काय निर्णय घेतो याकडे त्याच्या फॅन्सचे डोळे लागलेत. आमिर खान वेगवेगळ्या भूमिका करायला नेहमीच आघाडीवर असतो.

हेही वाचा

अमिताभ आणि माझ्या यशामागे अनेक स्त्रिया-शत्रुघ्न सिन्हा

पु. ल. देशपांडे आता हिंदी मालिकेत, पुलंच्या भूमिकेत मराठी अभिनेता

नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळलं

ओशो रजनीश यांच्या आश्रमात अनेक सेलिब्रिटी जायचे. विनोद खन्ना तर त्यांच्याकडे बरीच वर्ष उपासना करायचा. रजनीश यांचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलंय. त्यामुळे ते साकारणं एक आव्हानच असेल.

सगळं जुळून आलं तर या वर्षाच्या शेवटी सिनेमाचं शूटिंग सुरू होईल. आलिया भटही गली बाॅय आणि कलंक सिनेमांमध्ये बिझी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 12:05 PM IST

ताज्या बातम्या