'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी

'इतक्या' वर्षांनी आमिर ठरला अपयशी

ठग्स आॅफ हिंदोस्तान रिलीज झाला. पहिल्याच दिवशी सिनेमानं 52 कोटी कमावून रेकार्डब्रेक केला खरा. पण नंतर मात्र सिनेमाचं काहीच खरं नव्हतं.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : ठग्स आॅफ हिंदोस्तान रिलीज झाला. पहिल्याच दिवशी सिनेमानं 52 कोटी कमावून रेकार्डब्रेक केला खरा. पण नंतर मात्र सिनेमाचं काहीच खरं नव्हतं. समीक्षकांची टीका आणि प्रेक्षकांची नाराजी सिनेमाला भोवलीय. आमिर खानला एवढं मोठं अपयश मिळालं खरं, पण किती वर्षांनी माहितीये का?


आमिर खानला 13 वर्षांनी एवढं मोठं अपयश पाहायला मिळालंय. 2005साली मंगल पांडे: द रायझिंग सिनेमा आला होता. त्याचं दिग्दर्शन केतन मेहतांनी केलं होतं. तोही सिनेमा पडला होता. पण त्यानंतर रंग दे बसंती, फना, तारे जमी पर, थ्री इडियट्स, तलाश, धूम 3, पीके, दंगल सगळ्या सिनेमांनी बाॅक्स आॅफिसवर सुपरडुपर यश मिळवलं होतं.


आता 13 वर्षांनी ठग्सनं अपयश पाहिलं. या सिनेमाचं पहिल्या दिवशीचं गुरुवारचं कलेक्शन होतं 52.25 कोटी, शुक्रवारचं 29.25 कोटी, शनिवारचं 23.50 कोटी, रविवारचं 18 कोटी, सोमवारचं 6 कोटी, तर मंगळवारचं 4.75 कोटी होतं.


सगळीकडून आमिरवर टीका होत असताना त्याचा मित्र शाहरुख खान मात्र त्याच्या बाजूनं उभा राहिलाय.


शाहरुख म्हणालाय, आमिर आणि अमितजी यांचं सिनेसृष्टीला मिळालेलं योगदान खूप मोठं आहे. सिनेमा हा चांगला असू शकतो किंवा वाईट असू शकतो. मी सर्वात चांगला सिनेमा बनवलाय, असं कुणीच म्हणू शकत नाही,' शाहरुख टेलिग्राफशी बोलत होता.


शाहरुख पुढे म्हणाला, ' तुमच्या अपेक्षेप्रमाणे सिनेमा नाही बनलाय, तर त्या दोघांचं इतक्या वर्षाचं काम काय वाया गेलं का? लोक फारच कठोर टीका करतायत. त्यानं मनाला यातना होतायत. '


शाहरुख म्हणतो एका सिनेमाच्या अपयशाचा परिणाम आमिर आणि बिग बींवर होणार नाही. ते लवकरच नवं यश घेऊन येतील.


'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 11:15 AM IST

ताज्या बातम्या