आमिरनं टोचलं नाक,घातली नोज रिंग

आमिरनं टोचलं नाक,घातली नोज रिंग

सुशांत सिंग राजपूतने आमिरसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आमिरने नाक टोचलेलं दिसतंय.

  • Share this:

03 मे : आमिर कधी काय करेल काही सांगता येत नाही. प्रत्येक सिनेमातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अधिकाधिक आपलीशी वाटावी म्हणून तो वाटेल ते कष्ट घ्यायला तयार असतो. दंगलमधलंच बघा ना, सिनेमासाठी त्याने वजन वाढवलं आणि तेवढंच घटवलंही. त्याच्या या सिनेमाची प्रशंसाही खूप झाली. आमिरचा प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांना नवीन काहीतरी शिकवून जातो. उगाच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणत नाहीत.

सुशांत सिंग राजपूतने आमिरसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आमिरने नाक टोचलेलं दिसतंय. मुलींना शोभणारी नोज रिंग आमिरच्या भारदस्त शरीरावरही तेवढीच चांगली शोभून दिसतेय. पण त्याने हे नाक नक्की कशासाठी टोचलंय ते मात्र अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही.

सध्या आमिर ठग्ज ऑफ हिंदोस्तान या सिनेमाच्या तयारीत बिझी आहे. त्याचा हा लूक या सिनेमासाठी आहे की नाही याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 03:30 PM IST

ताज्या बातम्या