मुंबई, 30 मे : आमिर खानच्या 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'सर्फरोश'नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. हा सिनेमा प्रेक्षकांच्या खूपच पसंतीत उतरला होता. नुकतीच कारगील युद्धात सहभागी झालेले निवृत्त मेजर डी. पी. सिंह यांनी ट्विटरवर या सिनेमाच्या संबंधित एक भावूक पोस्ट लिहिली आणि महत्त्वाचं म्हणजे अभिनेता आमिर खाननंही त्यांच्या ट्वीटवर उत्तर दिलं आहे. मेजर डी. पी. सिंह यांनी 1999 मध्ये झालेल्या कारगील युद्धात डावा पाय गमवला आहे.
मेजर डी. पी. सिंह यांनी लिहिलं, '20 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा आमिर खानचा सर्फरोश सिनेमा पाहिला आणि 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा आज तोच सिनेमा पाहिला. पण त्यावेळी हा सिनेमा मी थिएटरमध्ये पाहिला होता आणि आता टीव्हीवर. त्यावेळी माझे दोन्ही पाय होते आणि आता एकच आहे. ऑपरेशन विजय जॉइन करण्याआधी (मे 1999)हा माझा शेवटचा सिनेमा होता.'
...म्हणून 2 कोटींची जाहिरात नाकारली, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
Exactly 20 years ago I watched movie #Sarfarosh of @aamir_khan and same I did just now.
But
That time it was in theater.
Now on TV.
That time on both legs.
Now one less.
My last movie as intact before I joined unit for #OpVijay in May 1999.#memories pic.twitter.com/rBmWtnhRX5
— Major D P Singh (@MajDPSingh) May 28, 2019
मेजर डी. पी सिंह यांचं ट्वीट पाहिल्यावर आमिरनं लगेच त्यांना रिप्लाय दिला, आमिरनं लिहिलं, 'डियर मेजर डी. पी. सिंह, तुमची पोस्ट पाहिल्यावर माझ्या अंगावर शहारे आले. तुमचं साहस, हिंमत आणि धैर्याला माझा सलाम.'
Dear @MajDPSingh, your post gave me goosebumps.
We salute your courage, strength and grit in the face of adversity.
Love and respect to you, Sir.
— Aamir Khan (@aamir_khan) May 29, 2019
'सर्फरोश' हा आमिरच्या बॉलिवूड करिअर मधील एक यशस्वी सिनेमा आहे. या सिनेमातील आमिरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला. हा सिनेमा दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मट्टन यांनी दिग्दर्शित केला होता. आमिरबरोबर या सिनेमामध्ये नसीरुद्दीन शाह आणि सोनाली बेंद्रे यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
'या' व्यक्तीमुळे अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाला होतोय उशीर
मेजर डी. पी. सिंह यांना 1999मध्ये अखनूर सेक्टरमध्ये LOC वर दुखापत झाली होती. या दुर्घटनेत त्यांनी आपला डावा पाय गमावला. मात्र त्यांनी हिंमत हारली नाही. त्यांनी एक कृत्रिम पाय बसवून घातला. तसेच अॅथेलिटिक करिअरमध्ये त्यांनी जवळपास 18 मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.
SPECIAL REPORT : ममतांच्या झिंगाट खासदारांचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल