Home /News /entertainment /

VIDEO: आमिर खानने मुलासोबत घेतला मुंबईच्या पावसाचा आनंद; बाप-लेकात रंगला फुटबॉल सामना

VIDEO: आमिर खानने मुलासोबत घेतला मुंबईच्या पावसाचा आनंद; बाप-लेकात रंगला फुटबॉल सामना

बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच अभिनेता आमिर खान (Aamir Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या आमिरचा मुलगा आझादसोबतचा (Azad Khan) एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

    मुंबई, 22 जून-  बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच अभिनेता आमिर खान   (Aamir Khan)  नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या आमिरचा मुलगा आझादसोबतचा (Azad Khan) एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये हा सुपरस्टार त्याचा मुलगा आझाद राव खानसोबत एका मजेदार फुटबॉल मॅचचा आनंद घेताना दिसत आहे. मुंबईच्या पावसात, आमिर आणि त्याची मुले धम्माल करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये या बाप-लेकाची जोडी खेळात चांगलीच मग्न दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. या व्हिडीओमध्ये एक रंजक गोष्ट पाहायला मिळत आहे, ती म्हणजे आझाद आमिरची नजर चुकवून अगदी चतुराईने गोल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आमिर खान आपल्या मुलांच्या अत्यंत जवळ आहे. आपल्या मुलांच्या आरोग्यामध्ये आणि वैयक्तिक वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे आमिर अनेकदा त्यांना खेळासाठी प्रोत्साहित करताना दिसतो. आमिर खान हा नेहमीच प्रत्येक खेळासाठी उत्सुक दिसतो. आमिर प्रत्येक खेळात उत्सुकतेने सहभागी होतो. टेबल टेनिसपासून ते कुस्ती आणि क्रिकेटपर्यंत प्रत्येक खेळाकडे आमिरचा कल आहे. आमिर केवळ खेळात रस घेत नाहीत तर तो आपल्या मुलांनाही त्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देतो. 'दंगल' या चित्रपटात आपण खेळासाठी असलेली निष्ठा आणि त्यासाठी घेतलेले कष्ट सर्वांनी पाहिले आहेत. (हे वाचा:सलमान खानच्या आगामी चित्रपटात झळकणार साऊथ अभिनेत्री; समंथा, रश्मिका,पूजा दिसणार एकत्र? ) आमिर खानच्या कामाबाबत सांगायचं झालं तर, तो लवकरच 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात करिना कपूर खान आणि मोना सिंग यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आमिर खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 'थ्री इडियट्स', तलाशनंतर आमिर आणि करिनाला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या