आमिर खानची 'धाकड गर्ल' कार अपघातातून थोडक्यात बचावली

दंगल चित्रपटातील आमिर खानची 'धाकड गर्ल' जायरा वसीम ही कार अपघातातून थोडक्यात बचावलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2017 04:53 PM IST

आमिर खानची 'धाकड गर्ल' कार अपघातातून थोडक्यात बचावली

10 जून : दंगल चित्रपटातील आमिर खानची 'धाकड गर्ल' जायरा वसीम ही कार अपघातातून थोडक्यात बचावलीये. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे तिच्या कारला अपघात झाला.

काश्मीरमध्ये जायरा वसीम ही आपल्या मित्रांसोबत जात होती. बुलवार्ड रोडजवळ ड्रायव्हरचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट डल तलावाच्या कोसळली. तिथे उपस्थिती असलेल्या लोकांच्या मदतीने कारला तलावातून बाहेर काढलं. या अपघातात जायराला किरकोळ दुखापत झाली. पण तिच्या मित्रांना मात्र दुखापत झाली असून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जायरा आपल्या मित्रांसोबत शुक्रवारी मध्यरात्री मित्रांसोबत जात होती तेव्हा डल तलावाजवळ बुलवार्ड रोडवर हा अपघात झाला.

तर प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, कारचा वेग खूप जास्त होता त्यामुळे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि कार थेट फुटपाथ पार करून तलावाच्या कठड्यांना धडकली. त्यानंतर कारचा तोल गेल्यामुळे ती तलावात कोसळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...