'हा' आहे आमिर खानच्या मुलीचा बॉयफ्रेंड, फोटो होत आहेत व्हायरल

'हा' आहे आमिर खानच्या मुलीचा बॉयफ्रेंड, फोटो होत आहेत व्हायरल

इरानं नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला ज्यात ती मिशाल कृपलानी नावाच्या एका मुलासोबत दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू असतानाच आता आमिरची मुलगी इरा खानसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. इरानं नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती मिशाल कृपलानी नावाच्या एका मुलासोबत दिसत आहे. यामुळे हा मुलगा इराचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर जोर धरला आहे.

इरानं हा फोटो शेअर करताना, 'आशा करते, तुझी वसंतातील सुट्टी ऊन आणि हास्याने परिपूर्ण राहिली असेल' असं कॅप्शनही दिलं आहे. या फोटोमध्ये दोघंही रोमँटिक अंदाजात एंजॉय करताना दिसत आहेत. इरानं हा फोटो शेअर केल्यावर लगेचच तिच्या फॉलोअर्सनी यावर कमेंट करायला सुरुवात केली. एका चाहत्यानं विचारलं, हा तुझा बॉयफ्रेंड आहे का ? दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं मिशाल तू खूप लकी आहेस. तिचा कधीच विश्वासघात करू नको. इरा माझी सर्वात पहिली क्रश आहे. त्यावेळी मी तिला तिच्या वडिलांसोबत पाहिलं होतं. मात्र इरा किंवा मिशालनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

Hope your Spring Break was sunny and smiley as @mishaalkirpalani's, which of course, I piled onto ❤❤❤ 📸 @sahirahoshidar

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

गेल्या वर्षी आमिर खाननं रमजान ईदच्या दिवशी इरा सोबत एक फोटो शेअर केला होता. ज्यामुळेआमिरला नेटीझन्सनी ट्रोल केलं होतं.असा फोटो रमजान ईदच्या वेळी शेअर करणं चूकीचं असल्याचं नेटीझन्सचं म्हणणं होतं. यावरून आमिरला नेटीझन्सच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं.

आमिरनं आपल्या 54व्या वाढदिवसादिवशी मुलाच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी खूप उत्सुक असल्याचं सांगितलं होतं. यावेळी तो म्हणाला, जुनैदनं बॉलिवूड पदार्पण करावं की करू नये हे पुर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यानं त्याच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घ्यायला हवेत. जुनैद खूप क्रिएटीव्ह आहे. तो सध्या नाटकांमध्ये काम करत असून तो त्याचं काम वेगानं करतो त्यामुळे मला वाटतं की त्यानं त्याचा मार्ग स्वतः शोधायला हवा.

First published: March 27, 2019, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading