मुंबई, 27 डिसेंबर- बॉलिवडूमधील स्टार किड्सची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. सुपरस्टार आमिर खानची(Aamir Khan) मुलगी ईरा खान (Ira Khan)ही अशाच स्टार किड्स पैकी एक आहे. सोशल मीडियावर इरा नेहमीच एक्टिव्ह असते आणि तिचे फोटोही नेहमीच चर्चेत असतात. आता ईराने तिचा एक फोटो शेअर केला असून तो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये इरा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत दिसत आहे.
न्यू इयर सेलिब्रेशनसाठी ईरा सध्या युरोपमध्ये गेली आहे. तिने बॉयफ्रेंड नुपूर सोबत ख्रिसमस साजरा केला आहे. या सेलिब्रेशनचे फोटो तिने शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ईरा तिच्या बॉयफ्रेंडला किस करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने शॉर्ट स्कर्ट, टॉप आणि जॅकेट घातलेलं दिसत आहे. ईरा आणि नुपूरची जोडी खूप सुंदर दिसत असून चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडलेले आहेत.
वाचा-'तू जिथं जाशील तिथं...', साखरपुड्यानंतर ऋता दुर्गुळेची प्रतीकसाठी खास पोस्ट
दुसरीकडे नुपूरही निळ्या रंगाचा शर्ट आणि बो टायमध्ये दिसत आहे. तसेच त्याने हॅटही घातली आहे. दोघांची जोडी रोमँटिक दिसत आहे. विशेष म्हणजे ईरा खान नेहमीच बॉयफ्रेंड नुपूर सोबतचे फोटो शेअर करत असते.
फोटो शेअर करत ईराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'मेरी ख्रिसमस. पार्च ' तर तिचा बॉयफ्रेंड नुपूरने देखील कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. या फोटोवर नेटकरी कमेंट करत आहेत. काहीजण त्यांना परफेक्ट कपल तर काहीजण त्यांना सुंदर कपल म्हणत आहे. एकाने म्हटले आहे की, माशाल्लाह...तुम्ही दोघ परफेक्ट दिसत आहात.
वाचा-चालता चालताच मलायकाचा ढासळला तोल; Video Viral होताच झाली ट्रोल
ईराला बनायचे आहे दिग्दर्शक
ईराला दिग्दर्शक बनायचे आहे. तिनं काही दिवसापूर्वी एका प्लेचं दिग्दर्शन केले होते. ज्यामध्ये युवराज सिंगची पत्नी अभिनेत्री हेजल किच मुख्य भूमिकेत होती. आता येणाऱ्या काळा ईरा बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून कधी पदार्पण करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment