Home /News /entertainment /

Aamir Khan ची मुलगी Ira Khan बॉलीवूड डेब्यूसाठी तयार? सांगितलं सत्य

Aamir Khan ची मुलगी Ira Khan बॉलीवूड डेब्यूसाठी तयार? सांगितलं सत्य

बॉलिवूड जगतात सध्या अनेक स्टार किड्स अभिनयाची जादू दाखवताना दिसतात. काहींनी आपल्या आई वडिलाच्या पाऊलवार पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आपलं नशिब आजमवलं आहे. तर कीहीजण या चमचमत्या दुनियेपासून लांब राहणं पसंत करतात

  मुंबई, 5 मार्च- बॉलिवूड जगतात सध्या अनेक स्टार किड्स अभिनयाची जादू दाखवताना दिसतात. काहींनी आपल्या आई वडिलाच्या पाऊलवार पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आपलं नशिब आजमवलं आहे. तर कीहीजण या चमचमत्या दुनियेपासून लांब राहणं पसंत करतात. काहींना अभिनयात करिअर करायचं नाही तर काहीतरी वेगळं करणं यांचे स्वप्न आहे. आमिर खानची ( Aamir Khan ) मुलगी आयरा खान देकील यापैकी एक आहे. आयरा खानने  ( Ira Khan ) आपल्या चाहत्यांसोबत नुकतच एख लाईव्ह केलं. तिला नेहमीच चाहत्यांसोबत कनेक्ट राहणं आवडतं. नुकतच तिनं चाहत्यांसोबत काही प्रश्न- उत्तरांचा राऊंड खेळला. ज्यामध्ये तिनं तिच्या आय़ुष्याशी निगडीत काही गोष्टींचा उलगडा केला. मानसिक तान, भविष्यात काय करणार..अशा अनेक गोष्टी आयराने यावेळी चाहत्यांसोबत शेअर केल्या. आयराने दिलं उत्तर यावेळी आयराला चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या बॉलिवूडमधील डेब्यूविषयी विचारलं. यावर आयराने देखील वेळ न घालवता लगेच उत्तर दिलं. ती म्हणाली की, सध्या तर मला सिनेमांमध्ये कसालच रस नाही. यावरून एकच समोर येते की, तिला बॉलिवूडमध्ये कसलाच रस नाही. तिला दिग्दर्शक व्हायचं आहे. वाचा-इतका राग होता तर मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? प्रसिद्ध लेखिकेचा सवाल आयरा खानने दिग्दर्शक म्हणून तिचा डेब्यू केला आहे. तिनं थिएटरमध्ये 'मीडिया' या प्लेचे दिग्दर्सन केलं आहे. तिच्या या प्लेमध्ये क्रिकेटर युवराह सिंहची बायको हेजल कीचने प्रमुख भूमिका साकारली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान देखील फिचर सिनेमा घेऊन येते. या सिनेमाचे नाव 'महाराजा' असल्याची चर्चा आहे. याची निर्मिती यशराज फिल्म्स करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा त्याचा दिग्दर्शक म्हणून डेब्यू आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ira Khan (@khan.ira)

  जुनैदच्या या फिचर फिल्ममध्ये शालिनी पांडे, शरवरी वाघ आणि जयदीप अह्लावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमासाछी जुनैद खुपच उत्साही आहे. तर आमिर खान देखील त्याच्या 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. या सिनेमात मोना सिंह, करीना कपूर खान आणि नागा चैतन्य यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 14 एप्रिल , 2022 ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या