Home /News /entertainment /

VIDEO : आयरा खानच्या फॅनचा थेट BF नुपूरला मेसेज! म्हणाला, 'हात लावलास तर..', मग जे झालं ते पाहाचं

VIDEO : आयरा खानच्या फॅनचा थेट BF नुपूरला मेसेज! म्हणाला, 'हात लावलास तर..', मग जे झालं ते पाहाचं

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान (Aamir Khan daughter Ira Khan) मुलगी आयरा बॉयफ्रेंड नुपूर शिखर सोबतचे खास फोटो तिच्या इन्स्टावर शेअर करत असते.

  मुंबई, 16 जानेवारी-  बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान (Aamir Khan daughter Ira Khan) ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आयरा बॉयफ्रेंड नुपूर शिखर सोबतचे खास फोटो तिच्या इन्स्टावर शेअर करत असते. गेल्या काही काळापासून आमिर कन्या फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आयरा आणि नुपूर दोघेही एकमेकांसोबचे मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण आयरा खानच्या काही चाहत्यांना तिचं नुपूरच्या अधिक जवळ असणं रुचलेलं दिसत नाही. कारण एका चाहत्यानं थेट नुपूरला मेसेज करून आयराला हात लावायचा नाही, असं सांगितलं आहे. इन्स्टाग्राम मेसेजमध्ये चाहत्यानं लिहलंय की, “आयरा माझं प्रेम आहे, हात लावू नको.” नुपूर शिखरनेही त्याला प्रत्युत्तर देताना एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. नुपूर शिखरचे आयराच्या चाहत्याला मजेशीर प्रत्युत्तर व्हिडिओत नुपूर एका सोफ्यावर बसून आपला फोन चेक करताना दिसत आहे. त्यानं आयराकडे पाहिलं तर ती सोफ्याच्या जवळच कंप्यूटरवर कामात व्यस्त दिसत आहे. नुपूर उठून तिच्याजवळ जातो आणि तिला बोटाने टच करतो. त्यानंतर पुन्हा तो तिच्याकडे जातो आणि किस करून परततो.
  View this post on Instagram

  A post shared by Popeye ⚓ (@nupur_shikhare)

  विशेष म्हणजे नुपूरने पोस्टला एक खास कॅप्शन दिले आहे. यामध्ये विकेंड, मूड आणि फन असे हॅशटॅग देत ‘यू कांट टच धिस’ च्या लिरिक्सचा वापर केला आहे. आयरा आणि नुपूरने गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये आपल्या प्रेमाची कबुली इन्स्टाग्रामवर दिली होती. आयराने प्रॉमिस डे दिवशी नुपूरसोबत एक सुंदर फोटो शेअर करत लिहलं होतं की, “आपल्याला प्रॉमिस करणं सन्मानजनक आहे.” वाचा-आमिर घटस्फोटानंतरही किरणला नाही विसरू शकला; तिच्यासाठी करणार.... दरम्यान, आमिर खानची मुलगी आयरा ही सोशल मीडियावर आपल्या मानसिक आरोग्याबरोबरच इतर मुद्द्यांवरही बोलत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांची चांगली पसंती मिळत असते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या