बॉयफ्रेंडसोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स, VIDEO व्हायरल

बॉयफ्रेंडसोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स, VIDEO व्हायरल

Aamir Khan Daughter Ira Khan : काही दिवसांपूर्वीच फॅन्सच्या प्रश्नांची उत्तरं देताना इरानं ती मिशालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता.

  • Share this:

मुंबई, 28 जून : बॉलिवूडचे स्टार किड्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. कोणी सोशल मीडियामुळे तर कोणी त्यांच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहेत. मात्र यात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे काही दिवसांपूर्वीच इरानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता त्यांचा रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘दबंग 3’ : विनोद खन्नांच्या जागी ‘हा’ अभिनेता साकारणार सलमानच्या वडिलांची भूमिका

 

View this post on Instagram

 

Birthday's should be week-long celebrations🎉 . . . #birthday #birthdayweek #21stbirthday #21 #longasscelebrations #newyork #friends #cake #rainorshine #splash #arcade

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इरा आणि मिशाल कपल डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत त्यांचे काही कॉमन फ्रेंडसुद्धा आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना इरानं त्याला, 'मला फक्त तुझ्यासोबत डान्स करायचा आहे'असं कॅप्शन दिलं आहे. इरा नेहमीच मिशाल सोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसते. या आधीही तिनं मिशालसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण काही दिवसांपूर्वीच फॅन्सच्या प्रश्नांची उत्तरं देताना इरानं ती मिशालसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता.

कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आमिर खाननं इरा आणि जुनैत दोघंही बॉलिवूड पदार्पण करू इच्छित असल्याचं सांगितलं होतं. मुलगा जुनैदला अभिनेता व्हायचं आहे तर इराला मात्र फिल्म मेकिंगमध्ये रुची आहे. इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. मागील वर्षी रमजानच्या काळआत इरासोबत शेअर केलेल्या एका फोटोमुळे आमिरला टीका सहन करावी लागली होती. सध्या आमिर खान त्याचा आगामी सिनेमा लाल सिंह चढ्ढाच्या तयारीत व्यग्र आहे. हा सिनेमा 1994 मध्ये आलेल्या टॉम हॅक स्टारर हॉलिवूडपट ‘द फॉरेस्ट गम्प’चा हिंदी रिमेक आहे.

VIDEO : निकच्या सतर्कतेमुळे मोठ्या दुर्घटनेतून वाचली प्रियांका चोप्रा

====================================================================

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 10:49 AM IST

ताज्या बातम्या