मुंबई, 04 डिसेंबर : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आज तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार आहे. आमिरला त्याच्या चित्रपटांमुळे देशातच नाही तर परदेशातही मान मिळाला आहे. पण सध्या फ्लॉप चित्रपटानंतर या अभिनेत्याने आता चित्रपटसृष्टीतुन काही काळ ब्रेक घेतला आहे. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान असे काही घडले की आमिर खूप भावूक झाला आणि काही वेळ रडायला लागला. मुलाखतीत आमिर त्याच्या भूतकाळातील आयुष्याबद्दल बोलत होता, त्यादरम्यान तो त्याच्या वडिलांच्या संघर्षाचे दिवस आठवून रडू लागला.
आमिर खानने नुकतीच एक मुलाखत दिली, या मुलाखतीत त्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. एका प्रश्नाच्या उत्तरात आमिरला त्याचे बालपणीचे दिवस आठवू लागले. आमिरने ते दिवस आठवले जेव्हा तो फक्त 10 वर्षांचा होता आणि तेव्हा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती. या अभिनेत्याने सांगितले की, त्याच्या वडिलांनी 'लॉकेट' नावाचा चित्रपट बनवण्यासाठी अनेक लोकांकडून व्याजावर कर्ज घेतले होते. 8 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.
हेही वाचा - Sonam Kapoor : लेकाच्या आठवणीत इमोशनल झाली सोनम; म्हणाली 'त्याला एकटं सोडून जाताना...'
आमिर म्हणाला, 'तो काळ होता जेव्हा कलाकार एकाच वेळी अनेक चित्रपट करत असत. तुम्ही मोठे चित्रपट दिग्दर्शक नसाल तर कलाकारांना वेळ मिळण्यात अडचणी येत होत्या. पुढे आमिरने सांगितले कि, 'चित्रपट न बनल्यामुळे त्याचे कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर आले होते. आमिर म्हणतो, 'अब्बाजानला पाहून आम्हाला खूप त्रास व्हायचा, कारण ते खूप साधा माणूस होते'.
वडिलांबद्दल सांगताना पुढे अमीर म्हणाला कि, ''त्याच्या वडिलांच्या काही चित्रपटात काम केले, पण त्यांच्याकडे कधीच पैसा नव्हता. त्याला अडचणीत पाहणे वेदनादायक होते कारण ज्या लोकांकडून त्याने पैसे घेतले होते त्यांचे फोन त्याला यायचे. मी काय करू, माझ्याकडे पैसे नाहीत, असे फोनवरून त्यांचे भांडण सुरू होते. माझा चित्रपट अडकला आहे, मला माझ्या कलाकारांना तारखा द्या, मी काय करू'. या आठवणी सांगताना आमिर इतका भावूक झाला की त्याला काही काळासाठी मुलाखत सोडून जावे लागले.
आमिर खानचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट लाल सिंह चड्ढाचा बॉक्स ऑफिसवर परफॉर्मन्स काही खास नव्हता. नंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झाला असला तरी इथेही लोकांना चित्रपट आवडला. दुसरीकडे, आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटानंतर, अभिनेता लवकरच काजोलच्या 'सलाम वेंकी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एक कॅमिओ करणार आहे, हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Bollywood actor, Bollywood News, Entertainment