आमिरने वाढदिवसानिमित्त सुरु केलं इन्स्टाग्राम अकाऊंट; पहिल्यांदा पोस्ट केला आईचा फोटो

आमिरने वाढदिवसानिमित्त सुरु केलं इन्स्टाग्राम अकाऊंट; पहिल्यांदा पोस्ट केला आईचा फोटो

'आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त आईमुळेच' असं त्याने फोटो शेअर करताना देखील म्हटलं आहे.

  • Share this:

14 मार्च : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. अखेरीस आमिरनं त्याच्या वाढदिवशी इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं आहे. विशेष म्हणजे आमिरने इन्स्टाग्रामवर काही पोस्ट करण्याआधीच अडीच लाखांहून अधिक लोकांनी त्याला फॉलो केलं आहे. चाहत्यांच्या या प्रतिसादामुळे आमिर खानही खुश झाला आहे.

मिस्टर परफेक्शनिस्टने प्रथमच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई जीनत हुसैन यांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे यातून आमिरचं त्याच्या आईशी असलेलं नातं आणि प्रेम दिसून आलं आहे.

'आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त आईमुळेच' असं त्याने फोटो शेअर करताना देखील म्हटलं आहे. आमिरच्या आईविषयीच्या प्रेमामुळे त्याची एक वेगळीच प्रतिमा त्याच्या चाहत्यांसमोर उभी राहिली आहे.

First published: March 14, 2018, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading