...म्हणून चीनमध्ये आमिरच्या सिनेमाचं प्रमोशन कराव लागलं रद्द

विद्यापिठात आमिर खान आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळ्यांनीच आमिरला पाहायला धाव घेतली. सभागृहात किती जण जमले असतील? तब्बल तीन हजारहून अधिक लोकांनी सभागृह भरलं.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 04:51 PM IST

...म्हणून चीनमध्ये आमिरच्या सिनेमाचं प्रमोशन कराव लागलं रद्द

मुंबई, 21 डिसेंबर : बाॅलिवूड अभिनेते आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप लोकप्रिय आहेत. त्यात पहिला नंबर लागतो तो आमिर खानचा. आमिर ठग्ज आॅफ हिंदोस्तान चीनमध्ये रिलीज करतोय. त्यासाठी चिनी विश्वविद्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

आमिर सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी चीनला गेला. तिथे गुआंगजो विश्वविद्यालयात त्याला विशेष अतिथी म्हणून बोलवलं गेलं होतं. साधारण त्या विद्यापिठाच्या सभागृहात 400 जणांना बसण्याची सोय केली गेली होती.

झालं असं की विद्यापिठात आमिर खान आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळ्यांनीच आमिरला पाहायला धाव घेतली. सभागृहात किती जण जमले असतील? तब्बल तीन हजारहून अधिक लोकांनी सभागृह भरलं. आयोजकांच्या तोंडचं पाणीच पळालं आणि त्यांनी हा कार्यक्रम रद्द केला.

लगेच आमिर खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. 3 इडियट्स सिनेमानंतर आमिरची लोकप्रियता चीनमध्ये वाढली. आमिरच्या दंगल सिनेमानं तर चीनमध्ये रेकाॅर्डब्रेक कमाई केली.

भारतात ठग्ज आॅफ हिंदोस्तानला अपयश मिळालं. आमिरवर टीका होत असताना त्याचा मित्र शाहरुख खान मात्र त्याच्या बाजूनं उभा राहिला.

Loading...

शाहरुख म्हणालाय, आमिर आणि अमितजी यांचं सिनेसृष्टीला मिळालेलं योगदान खूप मोठं आहे. सिनेमा हा चांगला असू शकतो किंवा वाईट असू शकतो. मी सर्वात चांगला सिनेमा बनवलाय, असं कुणीच म्हणू शकत नाही,' शाहरुख टेलिग्राफशी बोलत होता.

शाहरुख पुढे म्हणाला, ' तुमच्या अपेक्षेप्रमाणे सिनेमा नाही बनलाय, तर त्या दोघांचं इतक्या वर्षाचं काम काय वाया गेलं का? लोक फारच कठोर टीका करतायत. त्यानं मनाला यातना होतायत. '


शाहरुख म्हणतो एका सिनेमाच्या अपयशाचा परिणाम आमिर आणि बिग बींवर होणार नाही. ते लवकरच नवं यश घेऊन येतील.


निवेदिता सराफ एका बंडखोर भूमिकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...