आमिर खानने मुंबईत घराशेजारीच प्रॉपर्टी घेतली विकत, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

Aamir Khan सर्वसामान्य माणूस विचारही करू शकत नाही एवढ्या किंमतीची प्रॉपर्टी आमिरने मुंबईत आपल्या घराच्या शेजारीच घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 10:26 AM IST

आमिर खानने मुंबईत घराशेजारीच प्रॉपर्टी घेतली विकत, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई, 20 जून- आमिर खानने मुंबईत आपल्या घराच्या शेजारी एक प्रॉपर्टी विकत घेतली आहे. या प्रॉपर्टीची किंमत जवळपास ३५ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार आमिरने सांताक्रूझ पश्चिममध्ये एसपी रोडवर नऊ हजार स्क्वेअर फीटची जागा घेतली आहे. डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आमिरने प्रति स्क्वेअर फीटसाठी ३७ हजार ८५४ रुपये मोजले आहेत. प्राइम प्लाझा बिल्डिंगमध्ये घेतलेल्या या चार ऑफिस युनिटपैकी तीन युनिट दुसऱ्या मजल्यावर आणि एक युनिट चौथ्या मजल्यावर आहेत. यासाठी आमिरने स्टँप ड्यूटीसाटी तब्बल २.१ कोटी रुपयेही दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, या डीलवर आमिरची आई झीनत ताहिर हुसैन यांनी स्वाक्षरी केली आहे आणि आमिर खान प्रोडक्शन हाउसच्या नावावर या जागेची नोंदणी करण्यात आली आहे.
आमिर खान अनेक दिवसांपासून त्याच्या ऑफिससाठी जागा शोधत होता आणि शेवटी त्याला आपल्या घराच्या शेजारीच आवडेल अशी जागा मिळाली. आमिरने ऑफिसच्या जागेशिवाय बेसमेंट कार पार्किंगसाठीही आमिरने पैसे मोजले आहेत. प्रॉपर्टी कागदपत्रांनुसार, ही जागा शिपिंग कंपनी एंग्लो ईस्टर्न टँकर मॅनेजमेन्ट (हाँग काँग) लिमिटेडची होती.
आमिर खानच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूडचा हा परफेक्शनिस्ट लाल सिंग चड्ढा या सिनेमाच्या तयारीत सध्या व्यग्र आहे. हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गंप सिनेमाचा रिमेक असणार आहे. आमिरसोबत या सिनेमात करिना कपूर खानचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. आमिरने त्याच्या वाढदिवसाला सिनेमाची घोषणा केली होती. सिनेमातील व्यक्तिरेखेसाठी आमिर पुन्हा एकदा वजन वाढवताना दिसणार आहे. सिनेमातील व्यक्तिरेखा ही तरुणपणीतली असल्यामुळे आमिरला आपलं वजन कमी करावं लागणार आहे.

VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: aamir khan
First Published: Jun 20, 2019 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close