आमिर-किरणने अलीकडेच जाहीर केलेल्या घटस्फोटापासून (Aamir Khan’s Divorce) ते त्याने स्वतः पुन्हा लग्न का केले नाही इथपर्यंतच्या अनेक प्रश्नांची फैजलने मनमोकळेपणाने उत्तरं दिली.
मुंबई, 25 ऑगस्ट: बॉलिवूडचामिस्टर परफेक्शनिस्ट (Mr. Perfectionist) आमिर खान (Aamir Khan) याचा भाऊ फैजल खान (Faisal Khan) पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पणकरण्यासाठी सज्ज असून, आता तो दिग्दर्शक (Director) म्हणून ‘फॅक्टरी’ (Factory) या चित्रपटाद्वारे चाहत्यांना भेटायला येत आहे. त्याचा हाचित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरहीप्रदर्शित झाला आहे.काहीवर्षांपूर्वी ‘मेला’ (Mela) या चित्रपटातून फैजल खान यानं अभिनेता म्हणूनबॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दिसायला देखणा असणारा फैजल खानबॉलिवूडमध्ये आमिर खान प्रमाणेच स्थान निर्माण करेल, अशी अपेक्षा होती; पणहा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला आणि फैजलच्या कारकिर्दीला ग्रहणलागलं. त्याच काळात त्याला मानसिक आजार असल्याचे, त्याच्यावर आमिर खानअन्याय करत असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं. काही वर्षे त्यानंआमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये स्क्रिप्ट रायटर म्हणूनही काम केलं. पण दोन्ही भावांमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. कारकिर्दीप्रमाणेच कौटुंबिक पातळीवरहीत्याला अपयशाला सामोरं जावं लागलं. त्याचा घटस्फोट झाला. या सगळ्याप्रकारात फैजल खान हळूहळू मागे पडत गेला. आता मात्र फैजल खान पुन्हा एकदाबॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या वृत्तामुळे प्रकाशझोतात आला आहे.दिग्दर्शनाच्या क्षेत्रात तो आता नशीब आजमावून पाहत आहे.
हे वाचा-Bigg Boss OTT: अभिनेता राकेश बापट शमिता शेट्टीच्या प्रेमात?, म्हणतो की...याचित्रपटाच्या निमित्ताने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत फैजलखाननं, आमिर-किरणने अलीकडेच जाहीर केलेल्या घटस्फोटापासून (Aamir Khan’s Divorce) ते त्याने स्वतः पुन्हा लग्न का केले नाही इथपर्यंतच्या अनेक प्रश्नांची फैजलने मनमोकळेपणाने उत्तरं दिली. काही महिन्यांपूर्वी आमिर खान यानं अचानक पत्नी किरण रावपासून (Kiran Rao) घटस्फोट घेत असल्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.त्याबाबत बोलताना फैजल खान म्हणाला की, ‘आमीर आणि किरणला मी कोणताही सल्लादेऊ शकत नाही, कारण माझे स्वतःचे लग्न मी टिकवू शकलो नाही. त्यामुळेदुसऱ्याच्या खासगी आयुष्यावर काही बोलण्याचा मला अधिकार नाही.त्यांच्यासाठी काय चांगले आहे, हे त्यांना माहीत आहे.’हे वाचा-Prakash Raj यांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ, वयाच्या 56व्या वर्षी केलं लग्नदरम्यान, आता आमिर खान बरोबरचे संबंध सुधारले असून, आता आपण आपले सर्व निर्णय स्वतः घेत असल्याचे फैजल खान यानं नमूद केलं.स्वतःपुन्हा लग्न न करण्याबाबत बोलताना फैजल खान म्हणाला की, ‘माझ्याकडे सध्याइतके पैसे नाहीत की मी बायकोचा खर्च करू शकेन आणि गर्लफ्रेंडचा खर्चबायकोपेक्षा महाग असतो. त्यामुळे सध्या मी याबाबत काहीही विचार करत नाही.माझा चित्रपट ‘फॅक्टरी’ यशस्वी झाला तर मी गर्लफ्रेंडबद्दल विचार करेन. मीएक दिग्दर्शक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे.’
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.