Home /News /entertainment /

आमिर खाननं बदलली Birthday सेलिब्रेशनची वेळ, समोर आलं त्यामागचं कारण

आमिर खाननं बदलली Birthday सेलिब्रेशनची वेळ, समोर आलं त्यामागचं कारण

Aamir Khan 57th birthday

Aamir Khan 57th birthday

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. बी टाऊनमध्ये आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हणून ओळखले जाते. आमिरच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत. अशातच चाहत्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 मार्च: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) आज 57 वा वाढदिवस. बी टाऊनमध्ये आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हणून ओळखले जाते. आमिरच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा देत आहेत. अशातच चाहत्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमिर खान दोन वर्षांनंतर आपल्या चाहत्यांमध्ये आपला वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो त्याच्या वांद्रे पश्चिमेकडील घरी मीडियाच्या मित्रांसह वाढदिवस साजरा करणार होता, परंतु नुकत्याच झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणि सुरक्षेमुळे आमिरचे घर या कार्यक्रमासाठी योग्य नव्हते. त्यामुळे आमिरने आपल्या बर्थ डे सेलिब्रेशचे ठिकाण बदलले आहे. घराजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये तो आपला यंदाचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. इतकेच नव्हे तर त्याने आपल्या सेलिब्रेशनची वेळदेखील बदलली आहे. यापूर्वी त्याची वाढदिवसाची केक कापण्याची वेळ दुपारी 12 वाजता होती. आता त्यातही बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेनंतर सिनेसृष्टीसोबतच मुंबईतील अनेक सेलिब्रेटींनी आपल्या चाहत्यांसाी घराचे दरवाजे उघडले आहेत. लोकप्रिय अभिनेता आमिर खानही सोमवारपासून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधणार आहे. दोन वर्षांनंतर आमिरने त्याचा वाढदिवस पत्रकारांसोबत त्याच्या घरी साजरा करण्याची तयारी पूर्ण केली होती. सोमवारी त्यांची जयंती त्यांच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी मोठ्या थाटामाटात साजरी होईल, अशी तयारी सुरू होती. मात्र, त्याने त्याच्या या निर्णयात बदल केला. कोरोना सुरक्षेअभावी त्याने आपला वाढदिवस घरी न करता घराजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता मीडियासोबत बर्थ डे सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood actor, Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या