आमिरला KISS करण्यास जुहीनं दिला होता नकार, 'या' व्यक्तीमुळे झाली तयार

आमिरला KISS करण्यास जुहीनं दिला होता नकार, 'या' व्यक्तीमुळे झाली तयार

आमिर खान आणि जुही चावला यांनी ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आज 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. आमिरचं पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान असं आहे. ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आमिर खान आज एक अभिनेता, दिग्दर्शक, प्रोड्युसर आणि टीव्ही होस्ट आहे. 31 वर्षापूर्वी बॉलवूडमध्ये पाऊल ठेवणारा हा आमिर सिने इंडस्ट्रीमधील परफेक्ट आणि शिस्तप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.

आमिर खाननं ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री जुही चावलानं स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमामुळे हे दोन्ही कलाकार रातोरात स्टार झाले मात्र सिनेमात एक किसींग सीन होता. जो करण्यास जुहीनं नकार दिला होता. सिनेमाच्या स्क्रिप्टनुसार या सिनेमातील गाणं ‘अकेले है हम तो क्या है गम’मध्ये जुहीला आमिरच्या कपाळावर आणि गालावर किस करायचं होतं मात्र जुहीनं हे करण्यास नकार दिला. ज्यामुळे दिग्दर्शक मंसूर खान यांनी सिनेमाचं शूटिंग 10 मिनिटांसाठी थांबवलं.

आणखी एका मावळ्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर, ‘सरसेनापती हंबीरराव’चं पोस्टर रिलीज

दिग्दर्शकांना हा सीन परफेक्ट शूट करायचा होता. शेवटी त्यांनी जुहीची समजूत घातली. त्यानंतर सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. त्या सिनेमातील हा सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिनेमाच्या रिलीज अगोदर आणखी एक रंजक किस्सा घडला होता. आमिर आणि जुहीनं सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिनेमाची पोस्टर्स रिक्षावाल्यांना वाटत त्यांना रिक्षाच्या मागे हे पोस्टर्स चिटकवण्याची विनंती केली होती.

'त्यानं तर माझ्याही जाहिराती हिसकावल्या…’ कपिलचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप

सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापरलेल्या या युक्तीचा सिनेमाला खूप फायदा झाला. या सिनेमानं रेकॉर्डब्रेक कमाई केली. यातील गाणी सुद्धा प्रचंड हीट झाली. ‘कयामत से कयामत तक’साठी आमिरला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

‘मी स्वतःसाठी कपडे घालते, इतरांसाठी नाही’ ट्रोलर्सना दिशा पाटनीचं सडेतोड उत्तर

First published: March 14, 2020, 2:10 PM IST

ताज्या बातम्या