मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आमिर आणि सलमान दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होते आणि...

आमिर आणि सलमान दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यांवर फिरत होते आणि...

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याची मैत्री तर सर्वश्रुत आहे. या दोघांचा एक किस्सा आमिरनं एका मुलाखतीत शेअर केला होता.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याची मैत्री तर सर्वश्रुत आहे. या दोघांचा एक किस्सा आमिरनं एका मुलाखतीत शेअर केला होता.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याची मैत्री तर सर्वश्रुत आहे. या दोघांचा एक किस्सा आमिरनं एका मुलाखतीत शेअर केला होता.

  मुंबई, 14 मार्च : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा आज वाढदिवस. आपल्या अभिनयाच्या जोरावर आमिरनं बॉलिवूडमध्ये वेगळीच उंची गाठली. आमिर त्याच्या कोणत्याही सिनेमाबाबत अत्यंत जागरुक असतो आणि प्रत्येक सिनेमासाठी तो प्रचंड मेहनत घेतो. त्यामुळे त्याच्या सिनेमा हिट होणार हे ठरेलेलं असतं मात्र याशिवाय आमिर त्याच्या मैत्रीसाठीही ओळखला जातो. बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याची मैत्री तर सर्वश्रुत आहे. या दोघांचा एक किस्सा आमिरनं एका मुलाखतीत शेअर केला होता. आमिर खान आणि सलमान खान ही दोन नावं घेतली की त्यांचा अंदाज अपना अपना हा सिनेमा डोळ्यासमोर येतो. १९९४ मध्ये आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारसं चांगलं प्रदर्शन केलं नव्हतं. मात्र काही वर्षांनी हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये तुफान गाजला. आजही अनेक सिनेप्रेमींच्या तोंडावर या सिनेमाचे डायलॉग आहेत.सिनेमातील आमिर आणि सलमानची केमिस्ट्रीचं आजही अनेकजण भरभरून कौतुक करतात. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री जेवढी तगडी आहे तेवढीच त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीही मजबूत आहे. एका मुलाखतीत आमिरने त्याचा आणि सलमानचा एक किस्सा सांगितला होता. आमिर म्हणाला होता की, ‘एकदा मी आणि सलमानने दारू प्यायली होती. दारूच्या नशेत आम्ही रिक्षातून फिरत होतो. त्यावेळी मी रिक्षावाल्याला पैसे दिले नव्हते. कारण मी माझ्याकडे कधीच पैसे बाळगत नाही. मी नेहमी किरणकडून पैसे मागून घेतो किंवा माझा मॅनेजर मला गरज पडेल तसे पैसे देतो. पण मी कधीच स्वतःकडे पैसे ठेवत नाही. त्यामुळेच माझे पैसे सलमानला द्यावे लागले.’
  View this post on Instagram

  Sat Sri Akaal ji, myself Laal...Laal Singh Chaddha.🙏

  A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

  आमिर खानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याचा लाल सिंह चढ्ढा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलिवूड सिनेमा फॉरेस्ट गंप याचा हा बॉलिवूड रिमेक आहे. या सिनेमात करिना कपूर त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood, Salman khan

  पुढील बातम्या