Home /News /entertainment /

लेक आयरासाठी आमिर खान बनला मेकअप आर्टिस्ट, मि.परफेक्शनिस्टने दाखवलं आपलं नवं टॅलेंट

लेक आयरासाठी आमिर खान बनला मेकअप आर्टिस्ट, मि.परफेक्शनिस्टने दाखवलं आपलं नवं टॅलेंट

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खानला (Aamir Khan) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असं म्हटलं जातं. आमिर सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतो. परंतु अभिनेत्याची मुलगी (Daughter) आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

पुढे वाचा ...
  मुंबई, 28 एप्रिल-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता आमिर खानला  (Aamir Khan) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असं म्हटलं जातं. आमिर सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतो. परंतु अभिनेत्याची मुलगी  (Daughter)  आयरा खान  (Ira Khan)  सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आयरा सतत तिच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. आयरा आणि वडील आमिर फारच सुंदर बॉन्डिंग आहे.हे सर्वांनीच पाहिलं आहे.ती बऱ्याचवेळा आपल्या वडिलांसोबत वेळ घालवताना आणि मजामस्ती करताना दिसून येत. आयराची लेटेस्ट पोस्टसुद्धा अशीच काहीशी आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खानने खुलासा करत सांगितलं होतं की, 'कोरोना काळात त्याला जाणीव झाली की तो आपल्या मुलांना वडिलांचे ते प्रेम देऊ शकला नाही. पण आता जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याची आणि त्यांच्यासोबत मजा करण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडेच आमिर आपली मुलगी आयरा खानसाठी मेकअप आर्टिस्टदेखील बनला होता. इतकंच नव्हे तर त्याने आपल्या लेकीचा जबरदस्त मेकअपदेखील केला होता. आयराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांमधील खास बॉन्डिंग सर्वानांच दिसून येत आहे. फोटोंमध्ये, आमिरची लेक आपला मेकअप दाखविताना दिसत आहे. जो तिच्या वडिलांनी म्हणजेच मि परफेक्शनिस्ट आमिर खानने स्वतःच्या हातांनी केला आहे. सध्या आयराची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ira Khan (@khan.ira)

  आयरा खानने फोटो शेअर करत एक पोस्टसुद्धा लिहिली आहे. आयराने कॅप्शन लिहीत म्हटलं आहे- 'तुम्ही अंदाज लाऊ शकता का माझा मेकअप कोणी केला आहे? हे रंजक आहे जेव्हा तुमचे वडील तुमच्याकडे येतात आणि दावा करतात की ते तुमचा मेकअप तुमच्यापेक्षा चांगला करू शकतात. आणि ते अगदी बरोबर आहे''.आमिर आणि आयराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. युजर्स या दोघांच्या बॉन्डिंगचं कौतुक करत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या