S M L

दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला आमिरची उपस्थिती

परफेक्शनिस्ट आमिर खानला सुद्धा त्याच्या दंगल सिनेमासाठी यंदाचा विशेष पुरस्कार देण्यात आला. तर कपिल देव यांना क्रिकेटमधल्या त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

Sonali Deshpande | Updated On: Apr 25, 2017 03:22 PM IST

दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला आमिरची उपस्थिती

25 एप्रिल : 75वा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. परफेक्शनिस्ट आमिर खानला सुद्धा त्याच्या दंगल सिनेमासाठी यंदाचा विशेष पुरस्कार देण्यात आला. तर कपिल देव यांना क्रिकेटमधल्या त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

16 वर्षानी आमिर खान अॅवाॅर्ड सोहळ्यात सहभागी झाला. आमिरला दंगल चित्रपटासाठी हा पुरस्कार सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते देण्यात आला.

अभिनेता सुनील बर्वे निर्मित अमर फोटो स्टुडिओ या मराठी नाटकाला यंदाचा मोहन वाघ पुरस्कार देण्यात आला.  ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी मास्टर दीनानाथ विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं.

यावेळी गायिका लता मंगेशकर, अभिनेत्री वैजयंती माला आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close