मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /त्या चूकीसाठी आमिर खान आजही मागतो माफी; राणी मुखर्जीनं सांगितला भन्नाट किस्सा

त्या चूकीसाठी आमिर खान आजही मागतो माफी; राणी मुखर्जीनं सांगितला भन्नाट किस्सा

बॉलिवूडचा मिस्टर फरफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) देखील तिला सुनावलं होतं. वाचा राणीने सांगितलेला तो भन्नाट किस्सा.

बॉलिवूडचा मिस्टर फरफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) देखील तिला सुनावलं होतं. वाचा राणीने सांगितलेला तो भन्नाट किस्सा.

बॉलिवूडचा मिस्टर फरफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) देखील तिला सुनावलं होतं. वाचा राणीने सांगितलेला तो भन्नाट किस्सा.

मुंबई 21 मार्च: राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जबरदस्त अभिनय आणि अनोख्या आवाजाच्या जोरावर तिनं जवळपास एक दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. परंतु आपल्या अनोख्या आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या राणीला करिअरच्या सुरुवातीस मात्र अनेकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. अगदी बॉलिवूडचा मिस्टर फरफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) देखील तिला सुनावलं होतं. वाचा राणीने सांगितलेला तो भन्नाट किस्सा.

अलिकडेच बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत राणी मुखर्जीनं आपल्या करिअवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं आमिरसोबत घडलेला तो किस्सा सांगितला. आमिर आणि राणीनं सर्वप्रथम ‘गुलाम’ (Ghulam) या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तो राणीच्या करिअरमधील तीसराच चित्रपट होता. त्यामुळं आमिरनं तिचं काम फारसं पाहिलं नव्हतं. शिवाय तिचा आवाज त्याला अत्यंत त्रासदायक वाटायचा. तत्कालिन अभिनेत्रींच्या तुलनेत राणीचा आवाज जास्त जाड होता. त्यामुळं ‘गुलाम’ चित्रपटातील राणीचे संवाद त्यानं एका डबिंग आर्टिस्टकडून डब करुन घेतले. अर्थात त्याचा हा निर्णय राणीला आवडला नाही. परंतु सिनेसृष्टीत नवखी असल्यामुळं तिनं गप्पच राहाणं पसंत केलं.

अवश्य पाहा - सोनू सूदच्या कर्तृत्वाचा डंका आता आकाशातही घुमणार, स्पाइस जेटनं केला खास गौरव

View this post on Instagram

A post shared by • (@indiann_songs)

पुढे त्याच वर्षी तिनं शाहरुख खानसोबत ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात काम केलं. या चित्रपटात दिग्दर्शक करण जोहरनं तिचा खराखुरा आवाजच वापरला होता. अन् चित्रपटातील तिचा आवाज ऐकून आमिर खान स्तब्ध झाला. तिचा आवाज चित्रपटात फारच मधूर ऐकू येत होता. त्यानंतर त्वरीत त्यानं राणीला फोन केला आणि तिची माफी मागितली. मला माहित नव्हतं तुझा आवाज चित्रपटात इतका गोड ऐकू येऊ शकतो. असं म्हणत त्यानं राणीची माफी मागितली. अर्थात राणीनं देखील त्याला माफ केलं. जेव्हा कधी राणीला तिच्या आवाजाबद्दल प्रश्न केला जातो तेव्हा ती हा किस्सा सांगते.

First published:
top videos

    Tags: Aamir khan, Entertainment