शाहरुखच्या पार्टीला सलमान आणि आमिरनं आणली रंगत!

शाहरुखच्या पार्टीला सलमान आणि आमिरनं आणली रंगत!

शाहरुख खाननं झीरो सिनेमाच्या ट्रेलर लाँचनंतर सगळ्यांना पार्टी दिली. दिवाळी आणि वाढदिवस दोन्ही एकत्र आल्यानं ही पार्टीही मोठी जंगी होती.

  • Share this:

मुंबई, 5 नोव्हेंबर : शाहरुख खाननं झीरो सिनेमाच्या ट्रेलर लाँचनंतर सगळ्यांना पार्टी दिली. दिवाळी आणि वाढदिवस दोन्ही एकत्र आल्यानं ही पार्टीही मोठी जंगी होती. अख्खं बाॅलिवूड या पार्टीला अवतरलं होतं. पण या पार्टीत किंग खानचे दोन खास मित्र आले होते.

या दोन मित्रांच्या मैत्रीबद्दल नेहमीच उलटसुलट चर्चा होती. कधी यांच्यातल्या शीतयुद्धाबद्दल बोललं जायचं, तर कधी स्पर्धेबद्दल. पण हल्ली त्यांच्यात चांगलीच मैत्री दिसते. ते आहेत आमिर खान आणि सलमान खान.

दोघंही शाहरुखच्या वाढदिवसाला आले होते. शाहरुख-सलमानचा एकत्र फोटोही व्हायरल झालाय. सलमान किंग खानच्या झीरो सिनेमात गेस्ट म्हणून आहे. त्या दोघांचा पहिला टीझरही लोकप्रिय झाला होता. सोनम कपूरच्या लग्नाच्या पार्टीतही दोघं एकत्र नाचले होते.

मध्यंतरी दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू होतं. दोघं एकमेकांबरोबर आणि एकमेकांविषयी काहीच बोलायचे नाहीत. पण आता पुन्हा एकदा सर्व पूर्ववत झालंय.

शाहरुखच्या वाढदिवसाला आमिर खान एंट्री करत असलेला फोटोही व्हायरल झालाय. काही दिवसांपूर्वी शाहरुख-आमिर एकमेकांना भेटले होते. शाहरूख खाननं इन्स्ट्राग्रामवर आमिरसोबतचा फोटो पोस्ट केलाय. त्यावरची कॅप्शनही अचंबित करणारी आहे. हग फ्राॅम द ठग. आमिरला शुभेच्छा देण्यासाठी शाहरूख खान पोचला असावा. आमिरला उद्देशून त्यानं ही कॅप्शन लिहिलीय.

View this post on Instagram

Hug from the Thug....!! Beat that!

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

First published: November 5, 2018, 12:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading