सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फारच जुना असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये आमिर आणि करिना एका साडीच्या दुकानात असल्याचं दिसून येत आहे. याठिकाणी हॅन्डलूम साड्यांची निर्मिती केली जाते. आमिर आणि करिना एक कळायची रंगाची सुंदर हॅन्डलूम साडी पाहताना दिसून येत आहेत. व्हिडीओमध्ये आमिर खान त्या दुकानदाराला विचारत आहे, 'मी ही साडी खरेदी करू शकतो का? यावर दुकानदार म्हणतो 'हो नक्कीच'. त्यावर आमिर म्हणतो, मी ही साडी करिना कपूरला भेट देऊ इच्छितो. आमिर खान या साडीची किंमत विचारतो तेव्हा दुकानदार या साडीची किंमत 6000 असल्याचं सांगतो. यावर आमिर त्याला म्हणतो मी 6000 नाही देणार मी या साडीचे 25000 देणार, कारण ती तुमची मार्केट प्राईज आहे. आमिर अत्यंत आनंदाने ही साडी खरेदी करताना दिसून येत आहे. आमिरच्या मनाचा मोठेपणा पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. (हे वाचा:आलिया भट्टने पोस्ट केले Cute Photos, पण फोटोंपक्षा चर्चा अर्जुन कपूरच्या कमेंटची) या व्हिडीओमध्ये आमिर सोबत करिनासुद्धा आहे. करिनाला सुद्धा ही साडी फारच आवडल्याचं दिसून येत आहे. आमिर खानच्या दुकानदारासोबत झालेल्या चर्चेनंतर करिना पटकन ही साडी स्वतःवर लाऊन पाहते. ब्लॅक कलरची हॅण्डलून साडी आणि त्यावर असलेलं सुबक नक्षीकाम फारच सुंदर दिसत आहे. तसेच दुकानदार सांगतो 15 दिवसांत ही साडी तयार करण्यात आली आहे.आमिर आणि करिना लवकरच 'लालसिंह चड्ढा' मधून भेटीला येणार आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Bollywood, Entertainment, Kareena Kapoor, Video viral