Home /News /entertainment /

आमिर खान-आलिया भट्ट लवकरच दिसणार एकत्र? समोर आला नवा प्रोजक्ट

आमिर खान-आलिया भट्ट लवकरच दिसणार एकत्र? समोर आला नवा प्रोजक्ट

बॉलिवूड (Bollywood) अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत, ज्यांनी आजपर्यंत एकत्र काम केलेलं नाहीय. परंतु चाहते त्यांना एकत्र पडद्यावर पाहण्यातही उत्सुक आहेत. अशीच एक जोडी म्हणजे परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) होय. हे दोन्ही कलाकार अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये कुतुहल आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 31 मार्च-   बॉलिवूड   (Bollywood)  अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत, ज्यांनी आजपर्यंत एकत्र काम केलेलं नाहीय. परंतु चाहते त्यांना एकत्र पडद्यावर पाहण्यातही उत्सुक आहेत. अशीच एक जोडी म्हणजे परफेक्शनिस्ट आमिर खान   (Aamir Khan)  आणि अभिनेत्री आलिया भट्ट   (Alia Bhatt)  होय. हे दोन्ही कलाकार अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये कुतुहल आहे. असं म्हटलं जात आहे की, आलिया आणि आमिर पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. पाहूया काय आहे नेमकं सत्य. बॉलिवूडमध्ये आमिर खानला मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. त्याने अनेक दमदार चित्रपट देत नेहमीच १०० कोटी क्लबमध्ये आपलं नाव कोरलं आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांना आतुरतेने प्रतीक्षा असते. तर दुसरीकडे आलिया भट्ट आत्ताच्या तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनली आहे. आलियाने फारच कमी वयात अनेक जबरदस्त भूमिका साकारत आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. इतकंच नव्हे तर ती बॉलिवूडमधील सध्याची सर्वात महागडी अभिनेत्री बनली आहे. परंतु या दोन्ही कलाकारांनी कधीच एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाहीय. परंतु आता असं म्हटलं जात आहे की, आलिया भट्ट आणि आमिर खान पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, आमिर खान आणि आलिया भट्ट एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट आणि आमिर खान एका खास प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहेत. आमिर आणि आलिया एका जाहिरातीत स्क्रीन शेअर करणार आहेत. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. काल म्हणजेच 29 मार्च रोजी मुंबईतील फिल्मसिटी येथे त्याचे चित्रीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका सूत्राने इंडिया टुडेला सांगितलं आहे की, 'आलिया आणि आमिर एकत्र खूप छान दिसत आहेत. आमिरसोबत काम करण्यासाठी ती खूप उत्सुक होती.'' अलीकडेच, आमिर खान आणि आलिया भट्ट यांच्यासह 'RRR' स्टार्स राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी दिल्लीत चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटला हजेरी लावली होती. जिथे आमिरने 'RRR' च्या या कलाकरांसोबत धम्माल डान्स केला होता.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Aamir khan, Alia Bhatt, Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या