या दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट

या दिवाळीत अमिताभ-आमिर देणार खास ट्रीट

या सिनेमातून इतिहास उलगडणार आहे. याशिवाय या सिनेमातून आणखी एक ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 16 आॅक्टोबर : या दिवाळीत सिनेरसिकांना खास ट्रीट आहे . अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांचा 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान' दिवाळीत रिलीज होतोय. दोघांची जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे. शिवाय या सिनेमातून इतिहास उलगडणार आहे. याशिवाय या सिनेमातून आणखी एक ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे.

बाॅलिवूडचा महानायक आणि परफेक्शनिस्ट यांच्यात एक गाणं आहे. ते सिनेमात रंग आणणार आहे.या गाण्याची कोरिओग्राफी प्रभुदेवानं केलीय. गाणं अजून रिलीज केलेलं नाहीय. पण त्याचा फोटो समोर आलाय.

अगर आजादी है गुन्हा, तो मंजूर है सजा... असेच भारदस्त डायलाॅग्ज ऐकायला मिळणार आहेत. 1795मधली ही कथा. ब्रिटिश राजवटी विरोधात भारतीयांनी पुकारलेलं बंड. ते मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी नेमलेला फिरंगी. फिरंगी विरुद्ध आजाद असं फुंकलं गेलं रणशिंग.

हे सगळं पहायला मिळणार आहे नोव्हेंबरमध्ये. ' ठग्ज आॅफ हिंदोस्तान' सिनेमात. याचा ट्रेलर रिलीज झाला. लार्जर दॅन लाईफ शाॅट्स, जबरदस्त अॅक्शन्स, भारदस्त डायलाॅग्ज हे सर्व पाहून रसिक प्रेक्षक भारावूनच गेलेत. ट्रेलर इतका भव्य दिव्य, तर मग सिनेमा किती असेल, याचा विचार सगळे करतायत.

यश चोप्रांच्या जन्मदिनी हा ट्रेलर रिलीज केला गेला. यशराज फिल्म्सच्या इतिहासात हा सर्वात महागडा सिनेमा आहे. दिवाळीत 8 नोव्हेंबरला तो रिलीज होईल.

याशिवाय सिनेमात आमिर आणि बिग बींच्या दरम्यान एक फाईट सीन आहे. आमिर तो स्वत:च करणार आहे. बिग बींसाठी डबल्स वापरू, म्हणजे दुसरा कुणा तो शाॅट देईल असं दिग्दर्शकानं म्हटलं होतं . पण अमिताभना ते अजिबात मान्य नाही. त्यांनी स्वत:च तो सीन शूट केला.

सुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2018 11:05 AM IST

ताज्या बातम्या