मुंबई, 4 सप्टेंबर : अमिताभ बच्चन यांनी 70, 80च्या काळात बऱ्याच अॅक्शन फिल्म्स केल्या. अगदी आताच्या सिक्स पॅकवाल्या अभिनेत्याला लाजवेल अशाच या अॅक्शन्स होत्या. अॅक्शनच्या वेळी सगळी इमोशन्स बिग बींच्या डोळ्यातून आणि शारीरभाषेतून बाहेर यायची.
सध्या अमिताभ बच्चन आणि आमिर खान 'ठग्ज आॅफ हिंदुस्थान' सिनेमा एकत्र करतायत. विजय कृष्णानं दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात आमिर आणि आमिताभ यांना एकत्र बघणं हा एक वेगळा अनुभव ठरणार आहे. सिनेमा दिवाळीत रिलीज होईल.
सिनेमात आमिर आणि बिग बींच्या दरम्यान एक फाईट सीन आहे. आमिर तो स्वत:च करणार आहे. बिग बींसाठी डबल्स वापरू, म्हणजे दुसरा कुणा तो शाॅट देईल असं दिग्दर्शकानं म्हटलं. पण अमिताभना ते अजिबात मान्य नाही. ते स्वत:च तो सीन शूट करणार आहेत.
75 वर्षांचे बिग बी फाईट सीन करणार, याचं दिग्दर्शकाला आश्चर्यच वाटलं. अगदी आमिर खाननंही त्यांना समजावलं. उलट आमिरसोबत बिग बींनी मला तो सीन स्वत: करायचाय म्हणून वादही घातला. सिनेमात तो फाईटिंग सीन खूप महत्त्वाचा आहे. सिनेमाचा हायलाईटच आहे. त्यामुळेच बिग बींना तो स्वत: करायचाय.
'ठग्ज आॅफ हिंदुस्तान' 3डी आणि आयमॅक्समध्ये रिलीज होईल. तामिळ आणि तेलगूमध्येही सिनेमा पाहता येईल. 2018चा हा सर्वात मोठा सिनेमा ठरणार आहे.
बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट. प्रत्येक काम जीव तोडून करणार. त्याचा कुठलाही सिनेमा असू दे, त्यात तो अनेकदा 'लुडबूड' करणार. आणि ही त्याची लुडबूड प्रत्येकाला हवीशी वाटते. कारण आमिरचा सिनेमा हा बाॅक्स आॅफिसवरही हिट आणि समीक्षकांच्याही पसंतीला उतरतो. आताही आमिर खान ठग्ज आॅफ हिंदुस्थानी सिनेमात बिझी आहे. शूटिंगबरोबर पोस्ट प्राॅडक्शनमध्येही तो लक्ष घालतो. त्याचे त्याचे असे काही वसुल आहेत. नियम आहेत. आणि ते तो काटेकोरपणे पाळतो.
VIDEO : याला कुणी आवरा रे...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा