मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आमिर खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, लाल सिंह चड्ढा मूव्ही रिलीजनंतर करणार घोषणा?

आमिर खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, लाल सिंह चड्ढा मूव्ही रिलीजनंतर करणार घोषणा?

Aamir Khan

Aamir Khan

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार (Aamir Khan will announce his third wedding ) असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 21 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) मिस्टर परफेक्शनिस्ट(Mister Perfectionist) म्हणून ओळखला जातो. आमिरचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या खासगी आयुष्यावरुन चर्चेत आहे. दरम्यान, अमिर तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार (Aamir Khan will announce his third wedding ) असल्याची माहिती समोर आली आहे.

आमिर लाल सिंग चढ्ढा (Lal Singh Chaddha) हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे. अशी चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि किरण रावचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिर आता तिसरं लग्न कोणत्या अभिनेत्रीशी करणार अशा चर्चा सुरु झाल्या आणि यावरून आमिरला अनेकांनी ट्रोल केले होते.

आमिरने अजून तिसऱ्या लग्नावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी देखील त्याच्या लग्नाच्या चर्चा सुर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आमिर आणि किरण राव यांच्या घटोस्फोटाचे कारण फातिमा सना शेखला सांगण्यात आले. अभिनेता रावला घटस्फोट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फातिमा सना शेख सोशल मीडियावर ट्रेंड करू लागली. त्यामुळेच आमिरने किरणसोबतचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला, असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. मात्र, अफवा आता पुन्हा उफाळून आल्या. व्यावसायिकदृष्ट्या, फातिमा त्याला आपला गुरू मानते. दोघांनी दंगल आणि नंतर ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये एकत्र काम केले आहे.

आमिरने पहिले लग्न रीना दत्ताशी केले. या दाम्पत्याला इरा आणि जुनैद अशी दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर, अभिनेत्याने डिसेंबर 2005 मध्ये किरणशी लग्न केले. दोघांना एक मुलगा आझाद आहे. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण चांगले मित्र असले तरी. अलीकडेच खान साहेब एक्स पत्नीच्या घराबाहेर स्पॉट झाले होते.आता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.

First published:

Tags: Aamir khan, Entertainment