नवरात्रीत राधिका आणि शनायामध्ये रंगणार स्पर्धा, कोण बनणार किचन क्वीन?

सण समारंभ म्हटलं की घरामध्ये रेलचेल असते ती विविध पाककृती बनवण्याची. गोडधोड पदार्थ, चमचमीत, खमंग, खुसखुशीत पदार्थ बनवण्याची लगबग घराघरांत बघायला मिळते. यातही प्रत्येक सणाला काही तरी वेगळं आणि खास बनविण्याची इच्छा घरातील सुगरणींना असते. आता या सुगरणींच्या मदतीला येणार आहे झी मराठीच्या मालिकांमधील लाडक्या नायिका ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमाच्या माध्यमातून.

  • Share this:

नवरात्रीची चाहुल लागलीय. नवरात्रीचे नऊ पदार्थ तुम्हाला आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. आणि हे पदार्थ करणार आहेत मालिकेतल्या नायिका.

महत्त्वाचं म्हणजे राधिका आणि शनायामध्ये जबरदस्त स्पर्धा होणार आहे. तीही चांगला पदार्थ कोण बनवतेय याची. राधिका तर सुगरण आहेच. पण आता शनायाही मागे हटणार नाही.

झी मराठीच्या कुटुंबात नुकतीच सामील झालेली तुला पाहते रे मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार घटस्थापनेच्या भागात सहभागी होणार आहे.

पदार्थ करताना ईशा तिच्या आयुष्याबद्दलचे अनेक पैलू अगदी दिलखुलासपणे मांडणार आहे.

नवरात्रीच्या विशेषच्या दुसऱ्या भागात जागो मोहन प्यारेमधील भानू म्हणजेच श्रुती मराठे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती आपल्याला खास रेसिपी सांगणार आहे.

नवरात्रीच्या विशेष भागाची रंगत वाढवण्यासाठी तिसऱ्या भागात सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारी लागिरं झालं जी या मालिकेमधील अभिनेत्री शीतल म्हणजेच शिवानी बावकर येणार आहे. जर्मन भाषेतून प्रपोज करताना संकर्षण आणि शिवानी मध्ये नेमकी काय गंमत घडते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या माझ्या नवऱ्याची बायको या मालेकीमधील नवी शनाया म्हणजेच इशा केसकर देखील तिचं पाककला कौशल्य दाखवणार आहे.

 तसंच उत्तम खलनायिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली तुला पाहते रे मधील मायरा म्हणजेच अभिज्ञा भावे या विशेष भागात सहभागी होणार आहे.

शास्त्रीय नृत्यांगना ते अभिनेत्री हा रंजक प्रवास आणि अनेक प्रेरणा देणारे किस्से बाजी या मालिकेमधील हिरा म्हणजेच नुपूर दैठणकर आम्ही सारे खवय्येच्या नवरात्रीच्या विशेष भागात सांगणार आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधील राधिका म्हणजेच अनिता दाते आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबात दसरा साजरा करणार आहे. इतकंच नव्हे तर या सर्व लाडक्या नायिकांना आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये एक सरप्राईज देखील मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 05:42 PM IST

ताज्या बातम्या