मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Amhi sare khawayye : आता जोडीने होणार खवय्येगिरी; दामले पुन्हा येतायत ‘आम्ही सारे खवय्ये’ म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला

Amhi sare khawayye : आता जोडीने होणार खवय्येगिरी; दामले पुन्हा येतायत ‘आम्ही सारे खवय्ये’ म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला

आता प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम 'आम्ही सारे खवय्ये' पुन्हा सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील गावागावात आणि शहरातील सोसायटीमध्ये आम्ही सारे खवय्ये रंगणार आहे.

  मुंबई, 22 सप्टेंबर :  झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये कार्यक्रम प्रचंड हिट झाला होता. हा  कार्यक्रम पाहून महाराष्ट्रातील घराघरात गृहिणी अनेक नवनवीन पदार्थ करायला शिकल्या. प्रशांत दामले यांनी अनेक वर्ष या कार्यक्रमाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहचला होता. पण मध्यंतरी हा कार्यक्रम बंद झाला होता. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा एक प्रोमो नुकताच झी मराठीने प्रदर्शित केला असून एका नव्या ढंगात हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या नवरात्रात हा कर्यक्रम सुरु होणार आहे. या प्रोमोमध्ये प्रशांत दामले या पर्वाच  वेगळेपण सांगत आहेत. दरवेळी प्रमाणे फक्त पदार्थ बनवायचा नसून यावेळी खास स्पर्धा रंगणार आहे. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी असे या नवीन पर्वाचे नाव आहे. या पर्वाची खासियत म्हणजे इथे सासू सून, आई मुलगा, नवरा बायको पाककृती जोडीने बनवणार आहेत. तसेच कलाकारांच्या जोड्या ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.
  आम्ही सारे खवय्ये या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे या सांभाळणार आहेत. हे दोघे  नुकताच झी मराठीवरच किचन कल्लाकर या कार्यक्रमात झळकले होते. हा कार्यक्रम सुद्धा अशाच धाटणीचा होता. फक्त यात कलाकारांमध्ये पदार्थ बनवायची स्पर्धा रंगत असे. हेही वाचा - Subodh bhave : सुबोध भावे साकारणार 'धर्माभिमानी हिंदूची' भूमिका; नवीन माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला पण आता प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम  'आम्ही सारे खवय्ये' पुन्हा सुरु होणार आहे. कोल्हापूरपासून या पर्वाची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील गावागावात आणि शहरातील सोसायटीमध्ये आम्ही सारे खवय्ये रंगणार आहे. या नवीन पर्वाबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला पुन्हा हा कार्यक्रम सुरु होतोय त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे. परत एकदा मला गृहिणींच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या पाककृतींची चव चाखता येणार आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम येत्या 26 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी 2.30 वाजता सुरु असणार आहे.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Entertainment, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या