मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'SADAK 2 आता रस्त्यावर'; ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स

'SADAK 2 आता रस्त्यावर'; ट्रेलर रिलीज होताच काही तासांतच लाखो डिसलाइक्स

SADAK 2 फिल्मविरोधात प्रेक्षकांनी सोशल मीडियावर मोहीमच सुरू आहे.

SADAK 2 फिल्मविरोधात प्रेक्षकांनी सोशल मीडियावर मोहीमच सुरू आहे.

SADAK 2 फिल्मविरोधात प्रेक्षकांनी सोशल मीडियावर मोहीमच सुरू आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 12 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) बॉलिवूड नेपोटिझमवरून वाद सुरू झाला. स्टार किड्सना लक्ष्य केलं जाऊ लागलं आणि आता याच स्टार किड्सच्या फिल्म्सनाही नापसंती दर्शवली जात आहे. अभिनेत्री आलिया भट्टच्या (aalia bhatt) आणि अभिनेता  संजय दत्त (sanjay dutt) यांच्या सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर (SADAK 2 trailer) रिलीज होताच अवघ्या काही तासांतच लाखो प्रेक्षकांनी डिसलाइक केला आहे. युट्युबवर 2 चॅनेल्सवर सडक 2 चा ट्रेलर रिलीज करण्यात आला.  फॉक्स स्टार हिंदीच्या युट्यूब पेजवर जवळपास  21 लाख व्ह्युजसह 11 लाख लोकांनी हा ट्रेलर डिसलाइक केला आहे. तर डिज्नी हॉटस्टारच्या पेजवर 24 लाख व्ह्युजसह 2 लाखपेक्षा अधिक लोकांनी हा ट्रेलर जिसलाइक केला आहे. ट्विटरवरही असाच ट्रेंड पाहायला मिळाला. सडक-2 मधील मूख्य भूमिकेतील सर्वच कलाकार स्टार किड्सपैकी एक आहेत. सुशांतच्या निधनानंतर महेश भट्ट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचं शिकार व्हावं लागलं होतं. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या मुलींना घेऊन करण्यात आलेल्या या चित्रपटाला रोषाचा सामना करावा लागत आहे. याआधी या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर महेश भट्ट आणि सिनेमातील कलाकारांना रोषाचा सामना करावा लागला होता. दरम्यान आता ट्रेलर लाँच झाल्यानंतर सिनेमा न पाहण्याची भाषा पुन्हा एकदा सोशल मीडियावर केली जात आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबाबत सोशल मीडियावर चर्चा केली जात आहे. आलियाने या ट्रोल्सना कंटाळून सोशल मीडियावर कमेंट सेक्शन बंद ठेवले आहे. यावरून देखील तिला ट्रोल करण्यात आले होते. हे वाचा - 'सुशांतची मृत्यूनंतरची प्रसिद्धी PM पेक्षाही जास्त' NCPनेत्याच्या वक्तव्याने वाद सडक-2 हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमधून आलिया-आदित्यची अर्थात आर्या-विशालची लव्ह स्टोरी या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे, हे स्पष्ट समजते आहे. संजय दत्त रवि नावाच्या एका ट्रॅव्हल एजंटच्या भूमिकेत आहे. या सिनेमामध्ये देखील खलनायकामुळे हिरो-हिरोईनला वेगळे व्हावे लागणार असल्याची पटकथा आहे. अद्याप या ट्रेलरबाबत फार चांगल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत नाही आहेत. एके काळच्या हिट सिनेमाचा सिक्वेल म्हणून सडक-2 चर्चेत आहे. हे वाचा - सुशांतच्या वडिलांबद्दल केलेल्या दाव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले... महेश भट्ट यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमामध्ये जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर, प्रियंका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद देखील आहेत. एवढी तगडी स्टारकास्ट असताना बॉलिवूड नेपोटिझमचा वादामुळे ट्रेलरची जादू काही चालली नाही आता सिनेमा यशस्वी ठरेल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
First published:

Tags: Sanjay dutt, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या