20 जून : लवकरच गणपती बाप्पांवर बेतलेली एक मालिका सोनीवर येतेय. ती आहे 'विघ्नहर्ता गणेश'. या मालिकेतली एक महत्त्वाची भूमिका आहे पार्वतीची . या भूमिकेसाठी खूपच चुरस लागली होती . आणि शेवटी ही भूमिका मिळालीय हॉट अॅण्ड हॅपनिंग आकांक्षा पुरीला.
या भूमिकेसाठी सलमान सोबत करिअरची सुरुवात करणारी स्नेहा उल्लाल चर्चेत होती. तिला ही भूमिका मिळेल अशी कुजबुज चालू होती .तसंच फेमिना मिस इंडियाच्या 2012 ची विजेती असलेल्या पुर्वी राणाचेही नाव चर्चेत होते पण शेवटी आकांक्षानं ही रेस जिंकली.
आकांक्षानं याआधी मधुर भंडारकरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'मध्ये एक बोल्ड भूमिका निभावली होती. त्यानंतर तिला अनेक सेक्सी आणि इरोटिक भूमिकांची आॅफर येत होती. पण आकांक्षा एका वेगळ्या भूमिकेची वाट पाहत होती .
आता बघू या पार्वतीची भूमिका ती कशी निभावतेय.