SSR Case: पहिल्यांदाच रियानं दिली मुलाखत, युरोप ट्रीप ते हार्ड डिस्कबाबत केला मोठा खुलासा

SSR Case: पहिल्यांदाच रियानं दिली मुलाखत, युरोप ट्रीप ते हार्ड डिस्कबाबत केला मोठा खुलासा

सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली. यावेळी रियानं तिच्यावर करण्यात आलेल्या अनेक आरोपांचे खंडन केले.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput death case) मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली.

आजतकला दिलेल्या मुलाखतीत रियानं हार्ड डिस्कबाबत मोठा खुलासा केला. रियानं सांगितले की, "मी सुशांतच्या घरी असताना हार्ड डिस्कमधून कोणताही डेटा डिलीट केलेला नाही. मी गेल्यानंतर सुशांतची बहिण तिकडे गेली होती. त्यांना याबाबत विचारावे". तसेच रियानं, "सुशांतला मी कधीच कंट्रोल केलं नाही. सुशांत मी येण्याआधीच त्याच्या घरात काम करणाऱ्या लोकांनी ओळखत होता. त्यामुळे मी घरातला स्टाफ बदलल्याचा आरोप चुकीचा आहे". रियानं यावेळी आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचे सांगत सुशांतच्या वकिलांनी रियाचं पुरावे नष्ट केल्याचा आरोपही खोडून काढला.

वाचा-रियाने नष्ट केले पुरावे? सुशांतचं घर सोडण्याआधी 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट

युरोप ट्रीपबाबतही रियानं केला खुलासा

रिया म्हणाली की, "युरोपच्या प्रवासावर सुशांतने मला आणि प्रत्येकाला सांगितले की फ्लाइटमध्ये बसण्याची त्याला भीती वाटते कारण त्याला क्लॉस्ट्रोफोबिया आहे. त्यासाठी तो एक औषध घेतो. उड्डाण घेण्यापूर्वी त्यांनी स्वतः औषध घेतले". तसेच युरोप ट्रीपबाबत केलेल्या खर्चाबाबत विचारले असता रियानं सांगितले की, "मी पॅरिसमध्ये एका कंपनीबरोबर शूट केले होते. कपड्यांच्या कंपनीचा एक फॅशन शो होता. यासाठी कंपनीकडून माझं बिझिनेस क्लासचं तिकिटं आणि हॉटेल याचं बुकींग झाले होते. त्यानंतर सुशांतने युरोप ट्रीप करण्याचा विचार केला. त्यानं माझे तिकिट रद्द करून स्वत: खर्च केला". तसेच रियानं यावेळी सुशांतला किंग लाइफ जगायला आवडत असल्याचेही सांगितले. याआधी सुशांत आपल्या मित्रांसोबत थायलंडला गेला होता, त्यावेळी त्यानं 70 लाख खर्च केले होते.

वाचा-SSR Case: 'चहामध्ये 4 थेंब टाक आणि त्याला...', रियाचे 6 चॅट समोर आल्याने खळबळ

रियावर 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट केल्याचा आरोप

मीडिया रिपोर्टनुसार, रियानं (Rhea Chakraborty) सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे. सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानीच्या सीबीआय चौकशी दरम्यान, त्यानं हा खुलासा केला. पिठानीनं सीबीआयला सांगितले की, डेटा डिलीट करताना सुशांत तेथे उपस्थित होता, त्यानं कोणताही विरोध केला नाही. मात्र पिठानीने त्या हार्ड डिस्कमध्ये काय डेटा होता, याबाबत त्याला माहिती नाही. याआधी रियानं 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले होते, अशी माहिती होती.

वाचा-"तिने आयुष्यात कधीच ड्रग्ज घेतली नाहीत", रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी फेटाळला दाव

रिया चक्रवर्ती विरुद्ध FIR दाखल

ड्रग्जचा पुरवढा होत असल्याची माहिती मिळाल्याने Narcotics Control Bureau म्हणजे NCBने रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आली आहे. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यांना ड्रग्जचा पुरवढा केला जात होता याचे पुरावे ईडी ला मिळाल्याचा दावा NCBचे संचालक राकेश अस्थाना यांनी केला आहे. त्यानंतर रिया विरुद्ध कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 27, 2020, 12:32 PM IST

ताज्या बातम्या