मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aai Kuthe Kay Karte New Twist : अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण; होणार ‘या’ खास व्यक्तीची एंट्री

Aai Kuthe Kay Karte New Twist : अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण; होणार ‘या’ खास व्यक्तीची एंट्री

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte New Twist) मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार आहे.

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte New Twist) मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार आहे.

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte New Twist) मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार आहे.

  मुंबई, 20 ऑक्टोबर:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte New Twist) ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत सतत (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. आता मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. संजनाने अनिरुध्दशी लग्नही केलं आणि देशमुखांच्या घरात सून म्हणून दाखल झाली आहे. यानंतर आप्पांनी अरुंधतीला लेक मानून घराचा अर्धा हिस्सा तिच्या नावावर केला आहे. अरुंधती आता स्वावलंबी बनली आहे व स्वत:च्या पायावर ती उभी आहे. आश्रमाच्या ऑफीसात नोकरी करणारी अरुंधती मुलं व आई-आप्पांवर लक्ष ठेवण्यासाठी समोरच गौरीकडे राहिला आली आहे. अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. समृद्दीमधील तिचा हिस्सा तारण ठेवत पैसा उभा केला आणि अविनाशला मरणयातना भोगण्यापासून वाचवलं आहे. वाचा : आर्यन खानला मोठा झटका, पुन्हा जामीन फेटाळल्याने तुरुंगातील मुक्काम वाढला सुरुवातीला याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ते फक्त यश, आप्पा आणि अरुंधती यांनाच हे माहिती होते. यश जेव्हा गौरीला हे सांगत होता तेव्हा संजनाने हे ऐकले. त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात यांचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या सर्वांच्या प्रश्नाला अरुंधती कशी सामोरी जाणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  मात्र आता अरुंधतीने घराचा काही हिस्सा गहाण ठेवल्याचे देशमुख कुटुंबाला समजते. तर दुसरीकडे अरुंधतीचा मुलगा यश हा कामानिमित्त 10 दिवस बाहेरगावी जाणार असल्याचे दाखवलं जात आहे. अविनाशला मदत करण्याच्या नादात अरुंधती अडचणीत सापडली आहे. त्यामुळेआई कुठे काय करते’ या मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. वाचा : '..तेव्हा 2च रुपयांचा पास माझ्या खिशाला परवडत होता';अमिताभ यांना आठवले ते दिवस आता मालिकेत अरुंधतीच्या एका मित्राची एंट्री होणार आहे. अरुंधतीच्या या मित्राची भूमिका कोण साकारणार आहे, याबाबत आता पर्यंत काही खुलासा झालेला नाही. परंतु ही भूमिका समीर धर्माधिकारी साकारत असल्याची चर्चा सुरु आहे. आता अरुंधतीच्या आयुष्यात येणारा हा नवीन मित्र वादळ घेऊन येतो की तिला आधार देतो हे मालिकेच्या आगामी भागांतून स्पष्ट होणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv actress, TV serials

  पुढील बातम्या