मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आई कुठे काय करते: 'उर्मट माजोर्डा स्वार्थी...' म्हणत मिलिंद गवळीनं स्वत:लाच केलं ट्रोल

आई कुठे काय करते: 'उर्मट माजोर्डा स्वार्थी...' म्हणत मिलिंद गवळीनं स्वत:लाच केलं ट्रोल

आई कुठे काय करते या मालिकेत  अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी  (milind gawli ) साकारत आहे. मिलिंदने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट केली असून यामध्ये तो स्वत:लाच ट्रोल करताना दिसत आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (milind gawli ) साकारत आहे. मिलिंदने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट केली असून यामध्ये तो स्वत:लाच ट्रोल करताना दिसत आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (milind gawli ) साकारत आहे. मिलिंदने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट केली असून यामध्ये तो स्वत:लाच ट्रोल करताना दिसत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 7 डिसेंबर- स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte ) ही लोकप्रिय मालिका आता नव्या वळणावर आहे. या मालिकेत अरूंधतीचा मित्र आशुतोषची एंट्री झाली आहे. नुकताच मालिकेचा एक प्रोमो पुढे आला असून यामध्ये आशुतोषपुढे अनिरुद्ध निरुत्तर झाल्याचे दिसत आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी  (milind gawli ) साकारत आहे. मिलिंदने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट केली असून यामध्ये तो स्वत:लाच ट्रोल करताना दिसत आहे.

अभिनेता मिलिंद गवळीने आपल्या इंस्ट्राग्राम अकाउंटवरून आई कुठे काय करते या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना त्याने लिहलंय की, "Success is always not a fluke" किती महत्त्वाचं वाक्य आशुतोष केळकर म्हणतोय, "आशुतोष पुढे अनिरुद्ध निरुत्तर" खरंच अनिरुद्ध सारख्या माणसांकडे आशुतोष केळकर यां सारख्या च्या प्रश्नांची कधीच उत्तरं असतात? आशुतोष केळकर सारखी जी माणसं असतात, साधे सरळ प्रामाणिक असतात त्यांना आनंदी आयुष्य जगणं किती सोपं जातं, आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यशस्वी होत जातात आणि त्या यशाचा त्यांना गर्व नसतो, आशुतोष केळकर असाच गोड माणूस, आणि अशी माणसं आपल्याला हवीहवीशी वाटतात, आपल्याला म्हणजे फक्त अनिरुद्ध सारख्यांना नाही आवडत कारण त्यांच्यापेक्षा ते सुपिरियर असतात सगळ्याच बाबतीत, तेच अनिरुद्धला सहन होत नाही. खरेच किती कमी दिवसात आशुतोष केळकर लोकांचं आवडतं कॅरेक्टर झालं, खरंतर मलाही ते कॅरेक्टर खूपच आवडतात आणि कॅरेक्टर रंगवणारा ओमकार गोवर्धन हा पण खूप आवडतो, तो तसाच आहे आशुतोष केळकर सारखा, कधी कधी कलाकार आणि ते कॅरेक्टर अगदी एकरूप होतो, तसा आशुतोष केळकर या कॅरेक्टरमध्ये ओमकार फिट बसला.

वाचा : ऋता दुर्गुळेच्या लग्नाला उरले फक्त 18 दिवस ? ऋताची #18daystogo पोस्ट चर्चेत

मिलिंदने पुढे म्हटले आहे की, जसा अविनाशच्या कॅरेक्टरमध्ये आमचा शंतनु मोघे फिट बसला. सिरीयलच्या कास्टिंग डिपार्टमेंट म्हणजेच नमिता वर्तक, रवी कर्मारकर यांचं खरं कौतुकच आहे, एवढ्या सगळ्या कलाकारांमध्ये बरोबर त्या कॅरेक्टरला सूट होणारा कलाकार शोधायचा, किती कठीण काम आहे.

आमचा शंतनु मोघे अतिशय गोड प्रेमळ स्वभावाचा म्हणजे अविनाश सारखा अगदी तसाच, ओमकार गोवर्धन असाच सज्जन छान हुशार अगदी आशुतोष केळकर सारखा. माझ्या कधी कधी मनात विचार येतो की माझं कास्टिंग करताना अनिरुद्ध देशमुख सारख्या व्यक्तिरेखेचा कास्टिंग करतात मिलिंद गवळी सुचला, म्हणजे माझ्या मध्ये अनिरुद्ध देशमुख त्यांना दिसला, नक्कीच दिसला असणार, उर्मट माजोर्डा स्वार्थी. बापरे हे सगळे गुण माझ्यात आहेत? त्यांना दिसले? मिलिंद गवळी आत्मपरिक्षण करणं गरजेचे आहे, असेही मिलिंद गवळीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial