Home /News /entertainment /

अनिरुद्धनं अरुंधतीला दिला महत्त्वाचा सल्ला, एका निर्णयामुळं बदलणार अरुंधतीचं आयुष्य?

अनिरुद्धनं अरुंधतीला दिला महत्त्वाचा सल्ला, एका निर्णयामुळं बदलणार अरुंधतीचं आयुष्य?

aai kuthe kay karte latest episode : आशुतोष देखील आता बरा आला आहे. अशातच आता नेहमी अरुंधतीचे पाय खेचणारा अनिरुद्ध तिला महत्त्वाचा सल्ला देणार आहे.

  मुंबई, 15 मे- आई कुठे काय करते मालिका (  aai kuthe kay karte ) सततच्या ट्वीस्टमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आता मालिकेत एक मोठं वळणं आलं आहे. सुरूवातीपासूनच मालिका अरुंधती भोवती फिरताना दिसते. आता अरुंधतीच्या आयुष्यात एक मोठी घडमोड होणार आहे. आशुतोष देखील आता बरा आला आहे. अशातच आता नेहमी अरुंधतीचे पाय खेचणारा अनिरुद्ध तिला महत्त्वाचा सल्ला देणार आहे. आता अरुंधतीच्या एका निर्णयामुळं तिंच आयुष्य बदलणार का, याबद्दल सर्वांना उत्सुकता (  aai kuthe kay karte  latest episode) लागली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार, अनिरुद्ध आरूंधतीला सांगताना दिसतोय की आशुतोष आता बरा आहे. आमच्यासाठी तू खूप केलं आहे. आता तू तुझा विचार कर. आशुतोषचं तुझ्यावर प्रेम आहे आत तू त्याचा विचार कर..पहिल्यांदा अनिरूद्धनं अरुंधतीला असा काहीसा सल्ला दिला आहे. यानिमित्त अनिरुद्धची एक वेगळी बाजू पाहिण्यास मिळाली आहे. वाचा-गश्मिर महाजनीच्या मुलाच क्यूट व्हिडिओ पाहून म्हणाल, 'बिलकुल अपने बाप पे गया है' नेहमीच अरुंधतीचं पाय खेचणारा अनिरुद्ध या वाईट काळात मात्र तिला धीर देताना दिसला. तसं पाहता अरुंधतीच्या वाईट काळात नेहमीच आशुतोष तिच्यासोबत राहिला. आशुतोषचा अपघात झालेला पाहून अरूंधतीला चांगलाचा धक्का बसला होता. याकाळात खरं तिला तिच्या आशुतोषवरील प्रेमाची जाणीव झाली. नकळत का होईना तिनं तिच्या मनातील प्रेम भावना अनिरुद्ध जवळ बोलून दाखवल्या. खरं तर यावेळी मात्र अनिरुद्ध अरुंधतीला आधार देताना दिसला. त्यातला खरा माणूस यानिमित्ताने दिसला. तो हळूहळू बदलत असल्याचे दिसत आहे. वाचा-'जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या दोन अभिनेत्री..'किरण मानेंची पोस्ट अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी देखील हा प्रोमो शेअर करत एक पोस्ट केली आहे. त्य़ांनी म्हटलं आहे की,प्रत्येक माणसामध्ये एक चांगली बाजू असते ,अनिरुद्ध देशमुखमध्ये ही ती आहे. या सीनमध्ये नमिता आणि मुग्धाने ती बाजू खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहे. या सीनमधला एक डायलॉग मला खूपच आवडला , जो अरुंधतीशी, संजना विषयी बोलताना अनिरुद्ध तिला सांगतो,“ मी असं म्हणणार नाही की माझं संजनावर प्रेम नाहीये किंवा नव्हतं , पण धबधब्याखाली फार वेळ नाही बसू शकत, शांत नदीत पाय सोडून कितीही वेळ बसू शकतो. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
  अनिरुद्धनं दिलेल्या सल्ल्याचा अरुंधती विचार करणार का? आता तरी ती तिच्या प्रेमाचा विचार करून आशुतोषसोबत लग्नाचा ती निर्णय घेणार का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे येणाऱ्या भागातच मिळणार आहेत
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या