मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या लग्नात ईशा घालणार बाधा? नव्या प्रोमोने वाढवली उत्कंठा

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या लग्नात ईशा घालणार बाधा? नव्या प्रोमोने वाढवली उत्कंठा

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

Aai Kuthe Kay Karte Today Episode: 'आई कुठे काय करते' या मालिकेत दररोज रंजक अशा घडामोडी सुरुच असतात. मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षक अगदी खिळून असतात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची बोलणी सुरु आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 9 फेब्रुवारी- 'आई कुठे काय करते' या मालिकेत दररोज रंजक अशा घडामोडी सुरुच असतात. मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षक अगदी खिळून असतात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची बोलणी सुरु आहे. आशुतोष सुरुवातीपासूनच अरुंधतीला पसंत करत होता.दरम्यान आता अरुंधतीनेसुद्धा आशुतोषला लग्नाला होकार दिलेला आहे. त्यामुळे ते दोघे लवकरच एक होणार असं वाटत असताना त्यांच्या आयुष्यातील अडचणी काही संपताना दिसून येत नाहीत.

आई कुठे... या मालिकेबाबत सतत नवनव्या अपडेट्स जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक असतात. नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्याचं दिसून येत आहे. प्रोमो पाहून अरुंधती आणि आशुतोषला आपल्या लग्नासाठी आणखी काही अडचणींना मात द्यावी लागणार असल्याचं दिसून येत आहे.

(हे वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेवर भडकले प्रेक्षक, थेट दिला शो बंद करण्याचा सल्ला; नेमकं काय घडलं?)

सिरीयल जत्रा या इन्स्टाग्राम पेजवर हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधतीची मुलगी ईशा अरुंधतीला भेटायला येते. ईशा थोडी नाराज असल्याचं दिसून येत आहे. ती अरुंधतीला म्हणतेय, तू घेतलेला निर्णय योग्य असेलही. आशुतोष सर चांगले असतीलही पण... या प्रोमोवरून पुन्हा एकदा कोणता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार असा प्रेक्षकांना प्रश्न पडत आहे. ईशा आता आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नामध्ये बाधा आणणार का? हे पाहण्यासाठी सर्वच आतुर झाले आहेत.

दरम्यान आशुतोषसुद्धा अरुंधतीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आशुतोष अरुंधतीला म्हणतो मला तुला काहीतरी सांगायचं आहे. परंतु आशा आहे की ते ऐकून तू लग्नाला नकार देणार नाहीस. आशुतोषचं हे बोलणं ऐकून अरुंधती चिंतेत पडते. आशुतोष आपल्या कुंडलीत असेलल्या दोषबाबत अरुंधतीला सांगणार की आणखी काही ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिका टीआरपीच्या शर्यतीत सतत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असते. ही मालिका आई अर्थातच अरुंधती या पात्राभोवती फिरणारी आहे. परंतु तरीसुद्धा मालिकेतील इतर कलाकरांना तितकंच महत्व आहे. मालिकेच्या सुरुवातीलाही वेगळा आशय असणारी कथा प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. त्यामुळे अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती. या मालिकेवरुनच हिंदी मालिका 'अनुपमा' सुरु करण्यात आली होती. य मालिकेने आपला विशेष चाहतावर्ग निर्माण केला आहे.

First published:

Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi entertainment