मुंबई, 30 मार्च: आई कुठे काय करते या मालिकेत आता आईच्या म्हणजेच अरुंधतीच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली आहे. देशमुख कुटुंबीयांनी मोठ्या धुमधडाक्यात अरुंधतीचं दुसरं लग्न लावून दिलं. आईच्या लग्नात तिच्या मुलांनीही चांगलीच धमाल केली. आशुतोष सोबत अरुंधतीने संसार थाटला आहे. आता तिच्या आयुष्यात सगळं सुरळीत चालू असताना तिच्यासमोर मात्र नवं संकट उभं ठाकलं आहे. यश आणि गौरीच्या नात्यात दुरावा आला आहे. आता एकीकडे आईने नवा संसार थाटला असला तरी तिच्या मुलांच्या आयुष्यात मात्र नवं वादळ येणार आहे. आता मालिकेत पुन्हा मोठा ट्विस्ट येणार आहे.
'आई कुठे काय करते' ची सध्या प्रचंड चर्चा आहे. मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहेत. नुकतंच मालिकेत गौरीने यशबद्दल मोठा निर्णय घेतला. ती त्याला सोडून कायमची निघून गेली. त्यामुळे यश चांगलाच खचला आहे. यशला या सगळ्यातून अरुंधती कसं बाहेर काढणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता असताना आता अरुंधतीसमोर मोठं संकट पुन्हा एकदा निर्माण होणार आहे. आता अरुंधतीची लेक ईशाच्या आयुष्यात नवीन वादळ निर्माण होणार आहे. ईशाच्या त्या निर्णयामुळे मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.
Gayatri Joshi: पहिल्याच सिनेमात किंग खान सोबत केला रोमान्स; स्वदेस फेम अभिनेत्रीनं का सोडलं बॉलिवूड?
'आई कुठे काय करते' मालिकेचा नवीन अपडेट समोर आली आहे. त्यानुसार ईशा आणि अनिष येणाऱ्या काळात त्यांच्या भविष्याविषयी मोठा निर्णय घेणार आहेत. गौरी आणि यशचं नातं तुटल्याचा धक्का ईशाला बसला आहे. त्यामुळे इथे राहिलं तर अनिशची तिचं लग्न कधीच होणार नाही असं तिला वाटतंय. ती अनिषला म्हणते कि, 'तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना. इथे राहिलो तर आपलं लग्न कधीच होऊ शकत नाही. आपण पळून जाऊन लग्न करूया.'
View this post on Instagram
अरुंधतीला देखील या संकटाची चाहूल लागलेली आहे. त्यामुळे आता ईशा आणि अनिश पळून जाऊन लग्न करणार का ते पाहणं महत्वाचं आहे. ईशाच्या रूपाने मोठं संकट निर्माण होणार आहे. अरुंधती ईशाला पळून जाण्यापासून रोखू शकेल का, हे दोघे पुढे कोणतं पाऊल उचलणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेचं नवं कथानक सध्या चांगलच पसंत केलं जात आहे. मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषचं लग्नानंतरचं आयुष्य सुरु झालं आहे. या दोघांमध्ये आता प्रेमळ नात्याची सुरुवात झाली आहे. पण मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे अरुंधतीसमोर पुन्हा नवं आव्हान उभं राहील आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.