मुंबई, 21 मार्च, आई कुठे काय करते मालिकेत नुकतचं अरुंधती आणी आशुतोषचं लग्न पार पडलं आहे. आता दोघांनच्याही नव्या आयुष्याला सुरूवात झाली आहे. अशातच अरुंधतीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. लग्नानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की, अरुंधतीचा लूक कसा असणार? याचेच उत्तर आता या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारताना दिसते. मधुराणी नेहमीच मालिकेच्या सेटवरील काही सुंदर व्हिडिओ तसेच मालिकेतील लेटेस्ट अपडेट चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. आता देखील मधुराणीनं तिचा एक सुंदर असा लाल साडीतला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
विशेष म्हणजे हा व्हिडिओ आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरचा आहे. मधुराणी अरुंधतीच्या भूमिकेत दिसत आहे. अरुंधतीनं सुंदर लाल रंगाची साडी नेसली आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो पाहायला मिळत आहे. साध सरळ पण तितकाच प्रेमात पडायला भाग पाडणारा असा अरुंधतीचा हा लूक आहे. अरुंधतीचा हा लूक पाहून आशुतोष पुन्हा एखदा तिच्या प्रेमात पडेल हे नक्की आहे. मधुराणीनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे ब्यूटी..सोबत याच्या जोडीला जगजीत सिंह यांची 'होशवालो को क्या खबर...' ही गजल देखील जोडली आहे. त्यामुळं ही गजल आणि अरुंधतीचं सौंदर्य या दोन्ही गोष्टीची चाहत्यांना देखील भुरल पडली आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे.
वाचा-'अनुपमा' मालिकेच्या एका एपिसोडसाठी गौरव खन्ना घेतो लाखो रूपये?अशी आहे लाईफस्टाईल
एका चाहत्यानं म्हटलं आहे की, खूपच छान गोड स्वीट अजून काय बोलू सगळे काही कमीच आहे तुझ्या तारीफ मध्ये mam ❤️ तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,रूंधती खूप भारी दिसतंय तूम्ही 😍😍😍😍 अशा असंख्य कमेंट अरुंधतीच्या या नवीन लूकवर आल्या आहेत. मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. अरुंधती आता देशमुखांची सुन राहिलेली नाही. ती केळकरांची सुन झाली आहे. असं जरी असलं तरी देशमुखांच्या घरात आजही तिची मुलं राहतात. पण लग्नानंतर आता ती दोन्ही कुटुंबाना कसं मॅनेज करणार हे देखील पाहावं लागणार आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी अनेकदा तिच्या लेकीसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यापूर्वी देखील तिने तिच्या मुलीसोबत गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या दोघींची गाण्याची जुगलबंदी पाहायला मिळाली होती.मधुराणी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम कवित सादर करते हे चाहत्यांना माहित असेलच. ती अनेकवेळा तिच्या कविता सदीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्य़ांनसोबत शेअर करत असते. शिवाय ती उत्तम गाते देखील, तिला गायनाची देखील आवड आहे.
सध्या आई कुठे काय करते मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत अरुंधतीचं नुकतचं दुसरं लग्न झालं आहे. ती आता आयुष्याला नव्यानं सुरूवात करणार आहे. मित्र असणारा आशुतोष आता तिचा नवरा झाला आहे. याचा या दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार हे देखील आता समजेल. शिवाय या दोघांच्या संसारात अनिरुद्ध लुडबूड करणार का याची देखील सर्वांना उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment