मुंबई, 21 मार्च: आई कुठे काय करते या मालिकेची सध्या प्रचंड चर्चा आहे. मालिकेत सुरु असलेल्या कथानकामुळं सध्या सगळ्यांचंच लक्ष मालिकेवर वेधलं आहे. मालिकेत आई अरुंधतीचं दुसरं लग्न मुलांसहित सासू सासऱ्यांनी धुमधडाक्यात लावून दिलं. अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नातही तिच्या कुटुंबीयांचा उत्साह पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. मालिकेत आत अरुंधतीचं लग्न पार पडलं असून तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अरुंधतीला अखेर आशुतोषच्या रूपानं प्रेम मिळालं आहे. पण असं असताना तिचं पाहिलं कुटुंब मात्र तिच्यापासून दुरावत चाललं आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेचं नवं कथानक सध्या चांगलच पसंत केलं जात आहे. मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषचं लग्नानंतरचं आयुष्य सुरु झालं आहे. या दोघांमध्ये आता प्रेमळ नात्याची सुरुवात झाली आहे. पण आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यावरून अरुंधती एकीकडे नवी नाती जोडत असताना जुनी नाती तिच्यापासून दुरावणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
मालिकेच्या नवा प्रोमोनुसार, अरुंधती लग्नानंतर पहिल्यांदाच देशमुखांच्या घरी आली आहे. ती येताच अप्पा कांचन सहित घरातले सगळेच खूप खुश आहे. माहेरवाशीण असलेली अरुंधती अप्पाना म्हणते कि, 'आयुष्यभर जपून ठेवावा असा सोहळा केलात माझ्या लग्नाचा.' त्यावर अनिरुद्ध म्हणतो, 'आई अप्पाना समाजसेवा करायची सवयच आहे, बाकी तुझ्यासाठी एवढा करायची काही गरजच नव्हती, तुझा या घराशी काही संबंधच नाहीये.' पण अनिरुद्धच्या बोलण्याकडे अरुंधतीसहित सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं. पण तेवढ्यात तिथे अभि त्याच्या लेकीला घेऊन येतो. जानकीला पाहताच अरुंधती तिला जवळ घ्यायला जाते. पण अभि तिला रोखतो आणि तिथून निघून जाते.
View this post on Instagram
आता अभिच्या या वागण्यानंतर अनघा त्याला चांगलंच झोपते. तो म्हणतो, 'आई आजी ही नातीतरी लक्षात आहेत का तिच्या विचार तिला.' यावर उत्तर देत अनघा म्हणते, 'तिच्याशी एवढा वाईट वागू नकोस अभि... तिच्या मनातून कायमचा उतरशील तू' मालिकेच्या या प्रोमोमुळे आता देशमुख कुटुंबीय अरुंधतीपासून दुरावणार का हे पाहणं महत्वाचं आहे.
'आई कुठे काय करते' ही आईच्या विश्वाभोवती फिरणारी ही मालिका प्रेक्षकांसाठी रोजच्या आयुष्यातील एक भाग बनली आहे. या मालिकेतील आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाचा ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडला. त्यामुळेच मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. आता लग्नानंतर अरुंधतीचं आयुष्य कसं बदलणार, तिच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi entertainment, Marathi Serial