Home /News /entertainment /

वाढदिवसाच्या दिवशीच अरुंधती घेणार महत्त्वपूर्ण निर्णय; 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट

वाढदिवसाच्या दिवशीच अरुंधती घेणार महत्त्वपूर्ण निर्णय; 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट

स्टार प्रवाहवरील (Star Pravah) आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

  मुंबई, 01 जानेवारी : मराठी मालिकांमध्ये सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. स्टार प्रवाह(Star Pravah)वरील आई कुठे काय करते. ही अशीच एक मालिका. आई कुठे काय करते? (Aai Kuthe kay karte) ही एका सामान्य गृहिणीची कथा आहे. घराकडे लक्ष देता देता जी स्वत:चं अस्तित्व विसरते पण एवढं करुनही शेवटी तिचा नवराच तिच्यासोबत प्रतारणा करतो. आईची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभूलकरने (Madhurani Prabhulkar) बऱ्याच काळाने छोट्या पडद्यावर काम केलं आहे. पण या मालिकेतून तिचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. ‘आई कुठे काय करते’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्धकडून फसवणूक झाल्यानंतर खचून न जाता अरुंधती स्वावलंबी झाली आणि कठीण प्रसंगात तिने स्वत:ला आणि संपूर्ण कुटुंबाला सावरलं. एरवी अरुंधतीचा वाढदिवस कुणाच्या लक्षात रहात नसे. पण यंदा मात्र यश आणि गौरीने मिळून अरुंधतीच्या वाढदिवसाचं दिमाखदार सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे. त्यासाठी जोरदार प्लॅनिंगही सुरु झालं आहे. दुसरीकडे अनिरुद्धची नोकरी धोक्यात आल्यामुळे सासूबाईंचा सगळा राग अरुंधतीवर निघतो.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  अरुंधतीच्या वाढदिवसाचं अनिरुद्धलाही निमंत्रण असणार आहे. वाढदिवसाच्या दिवशीच अरुंधती एक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. हा निर्णय नेमका काय असणार? या निर्णयाचे संपूर्ण कुटुंबावर कसे पडसाद उमटणार? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.आजवर अरुंधतीचं खंबीर रुप प्रेक्षकांनी पाहिलं आहे. त्यामुळे अरुंधती नवीन वर्षात तिच्या आयुष्याची नव्याने कशी सुरुवात करते हे पहाणं उत्सुकतेचं असेल.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Marathi entertainment, Serial

  पुढील बातम्या