घटस्फोट आणि आशुतोषविषयी सर्व सत्य सांगितल्यावर अरुंधतीला राहण्यास घर कोण देणार?
घटस्फोट आणि आशुतोषविषयी सर्व सत्य सांगितल्यावर अरुंधतीला राहण्यास घर कोण देणार?
चारित्र्यावर संशय घेतल्याने अरुंधतीनं देशमुखाचं घर सोडलं आहे. काही काळासाठी ती तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी आली आहे. आता ती नवीन घराच्या (Aai Kuthe Kay Karte latest episode) शोधत आहे.
मुंबई, 26 फेब्रुवारी- आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिका सध्या टीआरपीमध्ये नंबर वन आहे. कारणही तसेच आहे सततचे ट्विस्ट आणि मालिकेची नायिका हिंन घेतलेला निर्णय यामुळे मालिका सोशल मीडियावर चर्चेत आहे. चारित्र्यावर संशय घेतल्याने अरुंधतीनं देशमुखाचं घर सोडलं आहे. काही काळासाठी ती तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी आली आहे. आता ती नवीन घराच्या (Aai Kuthe Kay Karte latest episode) शोधत आहे. आशुतोषच्या मदतीने घर शोधत आहे.
एकाटा स्त्रीला घर शोधताना समाजात खूप अडचणी येतात. अरुंधतीच्या बाबतीतही तसेच आहे. यासाठी तिला तिचा जवळचा मित्र आशुतोषची मदत मिळणार आहे. त्याचे मदतीने तिला नवीन घर देखील मिळालं आहे. याचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अरुंधती सांगताना दिसत आहे की, मी एकटीच राहणार आहे आणि माझा घटस्फोट झाला आहे. शिवाय ती यावेळी अवर्जून सांगताना दिसते की, मी यांच्याकडे म्हणजे आशुतोषकडे नोकरी करते. त्यामुळे हे कामानिमित्त माझ्याकडे कधीतरी येतील. तुम्हाला हे पटणार असेल तरच आपण पुढची बोलणी करूयात असं अरुंधती यावेळी घऱमालकांना सांगताना दिसते. यानंतर पुढे काय होते ते येणाऱ्या भागात समजणार आहे. पण या पोर्टलनं दिलेल्या मिहितीनुसार मित्र आशुतोषच्या मदतीने तिला हे घर मिळणार आहे.
मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. अरुंधतीकडून आई आणि संजनाने देशमुख घरातील तिचा हिस्सा परत घेतला आहे.आप्पानीं हा हिस्सा अरुंधतीला दिला होता. आता अरुंधतीकडं हक्काचं घऱ नाही मात्र तिच्याकडे तिची काही हाकाची माणसं आहेत. मित्र आशुतोष असेल किंवा तिचे सासरे किंवा मुलगा यश आणि सून अनघा ही सगळी मंडळी आजही तिच्या प्रत्येक प्रसंगात तिच्यासोबत उभी राहताना दिसतात. तिचं वाट जरी काट्यांची असली तर ही माणसं तिला कधीच त्रास होऊ देणार नाहीत हेही तितकेच खऱं आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.